सलमान खान आणि राखी सावंतला बिश्नोई ग्रुपकडून जीवे मारण्याची धमकी

सलमान खान आणि राखी सावंतला बिश्नोई ग्रुपकडून जीवे मारण्याची धमकी

याआधीही लॉरेन्स बिश्नोई ग्रुपकडून सलमानला धमकीचे मेसेज आले होते. परंतु, यावेळी राखी सावंतलाही धमकी दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि राखी सावंत यांना लॉरेन्स बिश्नोई ग्रुपकडून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यावेळी राखी सावंतच्या ईमेलवर ही धमकी आली आहे. याआधीही लॉरेन्स बिश्नोई ग्रुपकडून सलमानला धमकीचे मेसेज आले होते. या पार्श्वभूमीवर सलमान खानच्या सुरक्षा व्यवस्थेत पोलिसांनी वाढ केली होती. परंतु, यावेळी राखी सावंतलाही धमकी दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

राखी सावंतला एकाच दिवसांत दोन धमकीचे ई-मेल आले आहे. या ईमेलमध्ये बिश्नोई ग्रुपने म्हंटले की, राखी आमचे तुझ्याशी भांडण नाही. सलमान खानच्या प्रकरणात अडकू नकोस नाहीतर तुला खूप अडचणींचा सामना करायला लागेल. आणि तुझा भाऊ सलमानला आम्ही मुंबईतच मारून टाकू, तुम्ही कितीही सिक्युरिटी वाढवलीत तरी यावेळेस मी त्याला सिक्युरिटीतच मारून टाकेन. राखी तुझ्यासाठी शेवटचा इशारा आहे, नाहीतर तू तयार राहा, असे ई-मेलमध्ये लिहीले आहे. याखाली गुर्जर राजकुमार असे नाव लिहीण्यात आले असून आज संध्याकाळी ७.२२ वाजता राखी सावंतला हा ई-मेलला आला आहे.

दरम्यान, राखी सलमान खानला तिचा मोठा भाऊ मानते. त्यामुळेच सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यावर राखीने प्रतिक्रिया देत सलमान एक एक चांगला माणूस असल्याचे म्हंटले होते. एवढेच नाही तर हात जोडूनराखी सावंतने बिश्नोई समाजाची माफी मागितली. कान पकडून उठ्याबश्याही काढल्या होत्या. आणि सलमानाला लक्ष्य करू नका, अशी विनंती तिने केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com