Salman Khan
Salman KhanTeam Lokshahi

सलमान खानला डेंग्यूची लागण

सलमान खानच्या जागी बिग बॉसची होस्टिंग करण जोहर करणार?

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता खान सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. सलमान खानची तब्बेत बिघडल्याची माहिती मिळली आहे. त्यामुळे त्याचे सर्व काम काही काळासाठी थांबवण्यात आले आहे. सोबतच चालू असलेल्या बिग बॉसच्या शूटिंगला सुद्धा तो गैरहजर राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सलमान खानला डेंग्यू झाला आहे. भाईजानला डेंग्यू झाल्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्याच्या तब्बेत सुधारावी म्हणून चाहते प्रार्थना देखील करत आहेत.

Salman Khan
आजोबांसोबत नातवाची सवारी! राज ठाकरेंनी किआनला दाखवली शिवाजी पार्कची रोषणाई

सलमान खान येत्या काही आठवड्यांत शोमध्ये दिसणार नाही. 'बॉलिवूड हंगामा'मध्ये नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार, सलमान खानला डेंग्यू झाल्याचे निदान झाले असून डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. तो त्याच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाचे शूटिंगही करत होता. मात्र डेंग्यूमुळे सलमान खान काही काळ विश्रांतीवर जाणार असल्याचे कळत आहे.

माहिती नुसार, सलमान खानच्या जागी बिग बॉसची होस्टिंग करण जोहर करणार आहे. मात्र, बिग बॉसकडून आणि करण जोहर कडून याबाबत अधिकृत माहिती आलेली नाहीये. त्यामुळे सलमानच्या गैरहजेरीत बिग बॉसचे सूत्र कोणाच्या हातात जाणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com