Shraddha Walker Case Movie: श्रद्धा वालकर हत्याकांडावर बनणार चित्रपट

Shraddha Walker Case Movie: श्रद्धा वालकर हत्याकांडावर बनणार चित्रपट

सध्या देशात श्रद्धा वालकर या तरुणीच्या हत्येची प्रचंड चर्चा आहे. तिचा प्रियकर आफताब पुनावाला याने श्रद्धाची हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे मृतदेहाचे तब्बल ३५ तुकडे केले
Published by  :
shweta walge

सध्या देशात श्रद्धा वालकर या तरुणीच्या हत्येची प्रचंड चर्चा आहे. तिचा प्रियकर आफताब पुनावाला याने श्रद्धाची हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे मृतदेहाचे तब्बल ३५ तुकडे केले आणि फ्रिजमध्ये ठेवले. त्यानंतर तो हे तुकडे जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी टाकत असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणानंतर आफताबबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अशातच बॉलिवूडने या हत्याकांड प्रकरणावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे.

एका वृत्तानुसार, चित्रपट दिग्दर्शक मनीष एफ सिंग यांनी या प्रकरणावर चित्रपट बनवण्याच्या सुरूवातीच्या टप्प्याचे कामही सुरू केले आहे. रिपोर्टनुसार, हा चित्रपट श्रद्धा वालकरच्या हत्येवर आधारित असेल. चित्रपटाचे नाव who killed shraddha walker असे ठेवण्यात आले असून या चित्रपटाच्या पटकथेवरही काम सुरू झाले आहे. मात्र, जोपर्यंत पोलीस आरोपपत्र दाखल करत नाहीत, तोपर्यंत पटकथा निश्चित होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे

लव्ह जिहाद हा चित्रपटाचा मुद्दा असेल!

हा चित्रपट लव्ह जिहादवर असेल. मुलींची फसवणूक करून तिचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांचे कारस्थान जगासमोर उघड करणारा असा हा चित्रपट असेल. तसेच हा चित्रपट श्रद्धा वालकर प्रकरणावर नव्हे तर त्या प्रकरणावर प्रेरित असेल. श्रद्धा वालकर मर्डर केस बाबत बोलतानाही अनेक लोक लव्ह जिहाद चा उल्लेख करत आहेत. पण जोवर पोलीस या प्रकरणातील सर्व प्रकारचा तपास पूर्ण करत नाहीत, तोपर्यंत अशा कोणत्याही प्रतिक्रिया देणे योग्य नसल्याचे बोलले जात आहे. पोलीस प्रामाणिकपणे काम करत असून या प्रकरणाचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत. मनीष एफ सिंग यांनी त्यांच्या चित्रपटाबाबत स्पष्ट केले आहे.

Shraddha Walker Case Movie: श्रद्धा वालकर हत्याकांडावर बनणार चित्रपट
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा, श्रद्धाची आणि तिच्या मित्राची व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com