Genelia Deshmukh
Genelia DeshmukhTeam Lokshahi

'श्रावणी’चं टाळ्या-शिट्ट्यांनी स्वागत केलं, पण...; महाराष्ट्राच्या लाडक्या वहिनीची प्रेक्षकांसाठी खास पोस्ट

अभिनेत्री जिनिलिया देशमुख आणि अभिनेता रितेश देशमुख यांचा वेड हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप धमाकुळ घातला असून कोट्यवधींची कमाईही केली आहे.

अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) आणि तिचा पती अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांचा वेड (Ved) हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप धमाकुळ घातला असून कोट्यवधींची कमाईही केली आहे. तर वेड या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांनाही वेड लावले आहे. तसेच जिनिलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकांऊटवर या चित्रपटातील एका सीनचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करून तिने प्रेक्षकांचे मनापासून आभारही मानले आहेत. 

जिनिलियाने शेअर केलेल्या व्हिडीओमधून प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. तर तिने कॅप्शन लिहिले की, 'रिक्षातून भर पावसात तिचा उजवा पाय बाहेर पडतो. ती छत्री उघडते आणि पहिल्यांदा पडद्यावर दिसते. ‘श्रावणी’चं टाळ्या, शिट्ट्यांनी तुम्ही स्वागत केलं. पण ते माझंही मराठी चित्रपट जगातलं पहिलं पाऊल होतं. तुम्ही श्रावणीला दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.' जिनिलियाने शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स केले आहेत. जिनिलियाने शेअर केलेल्या व्हिडीओला एका यूजरने 'मराठी नसून ऐवढ छान मराठी बोलणे सोप्पे नाही, अशी कमेंट्स केली आहे.

Genelia Deshmukh
'वेड' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत समावेश

वेड चित्रपटातील गाणी संगीतकार अजय अतुल यांनी गायली आहेत. तर वेड चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता रितेश देशमुख यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांनी केली आहे. तसेच अशोक सराफ, विद्याधर जोशी, शुभंकर तावडे हे सर्व कलाकार मुख्य भुमिकेत दिसत आहेत. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com