sonu sood
sonu sood Team Lokshahi

मोहाली व्हिडिओ लीक प्रकरणावर सोनू सूदची प्रतिक्रिया; म्हणाला, ही वेळ आपल्या सर्वांसाठी...

मोहाली येथील विद्यार्थिनींचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर झाला आहे

पंजाबमधील मोहाली येथील एका खासगी विद्यापीठात एक धक्कादाक प्रकार समोर आला आहे. वसतिगृहातील मुलींचे आंघोळ करतानाचे कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची घटना घडली आहे. ही बाब समोर येताच काही तरुणींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्या ठिकाणी जोरदार आंदोलन देखील करण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण पूर्ण देशात वाऱ्यासारखे पसरले. आता याच प्रकरणावर अभिनेता सोनू सूदने प्रतिक्रिया दिली आहे.

sonu sood
धक्कादायक! 60 विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल; विद्यार्थिनींचा आत्महत्येचा प्रयत्न?

सोनू सूदने या प्रकरणाबाबत ट्विटवर आपले मत व्यक्त करत त्या विद्यार्थीनींना सोबत असल्याचे सांगतिले आहे. त्याने ट्विट मध्ये लिहले की, ‘चंदीगड विद्यापीठात जे घडले ते अत्यंत दुर्दैवी आहे. आपल्या भगिनींच्या पाठीशी उभे राहून जबाबदार समाजाचा आदर्श ठेवण्याची वेळ आली आहे. ही वेळ आपल्या सर्वांसाठी आहे, पीडितांसाठी नाही. जबाबदार राहा’. चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ लीक होऊन व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थिनींनी काल रात्री निदर्शने केली होती. असा मजकूर त्यांनी आपल्या ट्विटरवर लिहले आहे.

Lokshahi
www.lokshahi.com