Thalapathy vijay
Thalapathy vijayTeam Lokshahi

Thalapathy Vijay Birthday : थलपथी विजयला सेटवर भेटायला आलेल्या चाहतीच्या प्रेमात पडला

तमिळ सिनेसृष्टितील प्रभावशाली आणि प्रसिध्द अभिनेत्यांपैकी एक आहेत.

जोसेफ विजय चंद्रशेखर यांना चाहते थलपथी विजय (Thalapathy vijay) या नावाने ओळखले जातात. ते तमिळ (Tamil) सिनेसृष्टितील प्रभावशाली आणि प्रसिध्द अभिनेत्यांपैकी एक आहेत.

या अभिनेत्याने आपल्या करिअरमध्ये जवळपास 65 चित्रपट केले असून जवळपास प्रत्येक चित्रपट हिट झाला आहे. काहींनी रेकॉर्डब्रेक कमाई केलीआहे. थलपथी विजय केवळ अभिनयातच नाही तर नृत्यातही माहिर आहे.

आज थलपथी विजय त्यांचा ४८ वा वाढदिवस (Birthday) (साजरा करत आहे. थलपथी विजयच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, अभिनेत्याने वास्तविक जीवनात एका महिला चाहतीसोबत लग्न केले आहे.

थलपथी विजयला स्वप्नातही वाटले नव्हते की तो वास्तविक जीवनात त्याच्या कोणत्याही महिला चाहतीसोबत असे लग्न करेल. संगीता जेव्हा थलपथी विजयला पहिल्यांदा भेटायला आली तेव्हा ते मोठे स्टार नव्हते.

मात्र, कालांतराने त्यांनी इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला आणि मेहनतीने ते स्थान मिळवले. वास्तविक संगीता 'पूवे उनकगा' (1996) चित्रपटासाठी थलपथी विजयचे अभिनंदन करण्यासाठी आली होती. हा चित्रपट भारतातच नाही तर परदेशातही हिट झाला होता.

Thalapathy vijay
Kajal Aggarwal Birthday : टॉपलेस होण्यापासून ते कॉस्टारला जबरदस्ती किस करण्यापर्यंत, या वादांमुळे चर्चेत

रिपोर्ट्सनुसार, विजय संगीता (Sangita) यांच्या पहिल्या भेटीनंतर खूप प्रभावित झाला होता. संगीता त्याला भेटण्यासाठी लंडनहून भारतात आल्याचे कळताच अभिनेत्याला खूप आनंद झाला.

विजयने तीला संध्याकाळी घरी येण्याचे आमंत्रणही दिले होते. दोघांमध्ये मैत्री झाली आणि प्रेम झाले. तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेत्याने संगीतासोबत लग्न केले.

Thalapathy vijay
Urfi Javed: कधी फ्लॉवर बिकिनी तर कधी काचेचे ड्रेस आता तर चक्क...

थलपथी विजयच्या वडिलांनी संगीता यांना अभिनेत्याशी लग्न करण्याचा प्रश्न विचारला होता. संगीता लगेच हो म्हणाली. विजय आणि संगीता यांचा विवाह 25 ऑगस्ट 1999 रोजी झाला. या दोघांचे लग्न बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होते आणि त्यात साऊथ सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com