India Lockdown
India LockdownTeam Lokshahi

‘इंडिया लॉकडाऊन’ चित्रपट 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

‘इंडिया लॉकडाऊन’ चित्रपट २ डिसेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला.

बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हिने तिच्या अभिनयाच्या शैलीने मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांमधून प्रक्षेकांची मने जिंकून घेतली आहेत. सईने चित्रपट, मालिका आणि वेब सीरिजमध्येही काम केले आहे. तसेच सई सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय आहे. तिने तिच्या अगामी चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे. सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या ‘इंडिया लॉकडाऊन’आगामी चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केला असून सईचा या चित्रपटातील नवा लूक समोर आला आहे.

‘इंडिया लॉकडाऊन’ चित्रपटामध्ये सई ताम्हणकर ‘फूलमती’ हे पात्र साकारणार आहे. या पोस्टरमध्ये सई एखाद्या सामान्य घरातल्या मध्यमवर्गीय बाईप्रमाणे दिसत आहे. या पोस्टरमध्ये सई साध्या साडीमध्ये आणि गळ्यात मंगळसुत्र, कपाळावर कुंकू अशा लूकमध्ये दिसत आहे. तसेच सईच्या फोटोमागे भारताचा नकाशा पाहायला मिळत आहे.

India Lockdown
सई ताम्हणकर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये झळकणार

सईने शेअर केलेल्या पोस्टरला एक कॅप्शनही दिले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मधुर भांडारकर यांनी केले आहे. ‘इंडिया लॉकडाऊन’ चित्रपटामध्ये सईसह प्रतीक बब्बर, श्वेता बासु प्रसाद, आहाना कुमरा आणि प्रकाश बेलवाडी हे कलाकार मुख्य भुमिका साकारताना दिसणार आहेत. हा चित्रपट २ डिसेंबरला झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com