Thalapathy Vijay
Thalapathy VijayTeam Lokshahi

सुपरस्टार विजयचा 'वरिसु' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

4 जानेवारीला वरिसु (Varisu) या आगामी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

दाक्षिणात्य सिनेमासृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता थलापती विजय (Thalapathy Vijay) यांचा काल म्हणजे 4 जानेवारीला वरिसु (Varisu) या आगामी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. विजयच्या या ट्रेलरला सिनेप्रेमींकडून खूप पसंती मिळत आहे. या सिनेमाचा ट्रेलर पाहून आता सिनेप्रेमी वरिसु या सिनेमाची वाट पाहत आहेत.

वरिसु या चित्रपटात विजय आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) आणि अभिनेते प्रकाश राज, आर सरथकुमार, प्रभू, शाम, श्रीकांत, खुशबू, योगी बाबू, जयसुधा, संगीता क्रिश, संयुक्ता षण्मुघनाथन, नंदिनी राय, गणेश वेंकटरामन, श्रीमन, व्हीटी गणेशन, जॉन विजय, भरत रेड्डी, संजना हे सर्व कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Thalapathy Vijay
Thalapathy Vijay Birthday : थलपथी विजयला सेटवर भेटायला आलेल्या चाहतीच्या प्रेमात पडला

वरिसु हा चित्रपट तेलगू आणि तमिळ या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन वामशी पडाईपल्ली यांनी केलं आहे. राजू, शिरीष यांनी वरिसु या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com