Nashik
Nashik Team Lokshahi

Nashik : वारंवार खंडीत वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांने दोन एक कांद्यावर फिरवला नांगर

कांदा पिकाला पाणी मिळात नसल्याने शेतकरी हतबल
Published by :
shamal ghanekar
Published on

शेतकऱ्यावर (Farmers) संकटे नेहमी येत असतात. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे तर कधी प्रतिकूल हवामानामुळे शेतपिकावर त्याचा परिणाम होत असतो. असे वारंवार होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असतो. पण मात्र यावेळी पावसामुळे पिके चांगली झाली आणि उत्पादन खर्चात वाढ होत आहे. पण दुसरीकडे पाहायला गेले तर मात्र शेतीला पाणी देण्यासाठी लागणारी विज वेळोवेळी खंडीत होत आहे. त्यामुळे पिकांचे भरणे होत नाही. पाणीपुरवठा उपलब्ध असूनही विजेचे खंडीत होत असल्याने त्याचा त्रास पिकांना होत आहे.

Nashik
Video | खासदार नवनीत राणा यांनी आदिवासी नृत्य करून केली होळी साजरी

महावितरण यांच्याकडून केल्या जाणाऱ्या कमी दाबाचा आणि सारखी वीज खंडित झाल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा संकटाचा सामना करावा लागत आहे. वारंवार वीज खंडित झाल्याने पिकांना पाणी देता येत नाही आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर महावितरण निर्मित आपत्ती शेतकर्‍यांवर ओढवली असून आता शेतकर्‍यांकडून संताप व्यक्त केला जातो आहे.

Nashik
"राज ठाकरेंच्या वक्तव्याला पाठिंबा, फक्त अमित ठाकरेंना..." - सुजात आंबेडकर

नाशिकच्या (Nashik) येवलामध्ये (Yeola) विजेता लपंडाव सुरू असल्याने योग्य वेळी कांदा पिकाला पाणी देता येत नाही आहे. त्यामुळे येवल्यातील एका शेतकऱ्यांनी शेतातील दोन एकर कांद्यावरून नांगर फिरवला आहे. मागील दोन महिन्यांपासून कांद्या पिकाला योग्यवेळी पाणी भरणं सुरू होते. मात्र उन्हाचा तडाख्यामुळे आणि सध्या सुरू असलेले विजेचे खंडीत होणे यामुळे कांद्या पिकाला पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे कांदा पिकाची वाढ होत नाही. यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांने आपल्याच शेतात दोन एकर अक्षरशः कांद्याच्या पिकावरून ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरून पिक मातीमोल केला. यामधून उत्पादन खर्चही निघणार नसल्याने या शेतकऱ्याने हा निर्णय घेतला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com