Dinvishesh
DinvisheshTeam Lokshahi

आज काय घडले : देवी रोगाचे भारतातून समूळ उच्चाटन

पी.व्ही. सिंधू यांचा जन्म, डॉ. अनुग्रह नारायण सिन्हा यांचे यांचे निधन
Published by :
Team Lokshahi

सुविचार

नाही जमणार, असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणत केलेली सुरवात म्हणजे यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल.

आज काय घडले

  • १९१३ मध्ये बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली. यासाठी किर्लोस्कर नाटक मंडळाचे प्रमुख नायक गणपतराव बोडस व गोविंदराव टेंबे यांचे सहकार्य त्यांना लाभले.

  • १९५४ मध्ये बीबीसीने पहिले टेलिव्हिजन बातम्या बुलेटिन प्रसारित केले. हे २० मिनिटांचे बुलेटीन होते.

  • १९७५ मध्ये देवी रोगाचे भारतातून समूळ उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले.

Dinvishesh
आज काय घडले : टायगर हिल्स घुसखोऱ्यांच्या ताब्यातून मुक्त

आज यांचा जन्म

  • केंद्रीय उद्योगमंत्री आणि केरळचे मुख्यमंत्री के. करुणारन यांचा १९१८ मध्ये जन्म झाला.

  • प्रसिद्ध भारतीय राजकारणी व लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान यांचा १९४३ मध्ये जन्म झाला.

  • चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक रेणू सलुजा यांचा १९५२ मध्ये जन्म झाला.

  • युट्युब चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुसान वॉजिकी यांचा १९६८ मध्ये जन्म झाला. गुगलच्या निर्मितीत त्यांचा मोठा वाटा आहे.

  • भारतीय बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू यांचा १९९५ मध्ये जन्म झाला. त्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये बॅडमिंटनमध्ये अंतिम सामन्यात पोहोचणारी भारताची पहिली खेळाडू तसेच ऑलिंपिक खेळात रौप्यपदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

Dinvishesh
आज काय घडले : कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीकडे

आज यांची पुण्यतिथी

  • सिंगापूरचे संस्थापक सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स यांचे १८२६ मध्ये निधन झाले.

  • भारतीय राष्ट्रवादी राजकारणी, महात्मा गांधी यांच्या गांधीवादी चंपारण्य सत्याग्रहाचे सदस्य डॉ. अनुग्रह नारायण सिन्हा यांचे १९५७ मध्ये निधन झाले.

  • बाबूराव अर्नाळकर या टोपणनावाने लिहिणारे मराठी लेखक चंद्रकांत चव्हाण यांचे १९९६ मध्ये निधन झाले. त्यांनी एकूण १०४२ रहस्यकथा लिहिल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com