makar sankranti
makar sankrantiTeam Lokshahi

14 की 15 जानेवारी? नक्की कधी आहे मकर संक्राती? जाणून घ्या अचूक तारीख

दरवर्षी 14 जानेवारीला साजरी होणारी मकर संक्रात 2023 मध्ये 15 तारखेला नमूद केली आहे. यामुळे तारखेबाबत लोक संभ्रमात आहे.

मकर संक्रांतीचा सण हिंदू धर्मात विशेष मानला जातो. देशभरात मकर संक्रात हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्य हा धनू राशीतून शनिचा पुत्र मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून या दिवसानंतर दिवस हा मोठा आणि रात्र लहान होते. नववर्षातला पहिला सण मोठ्या उत्साहने साजरा केला जातो.

धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी नववधू-वरांला विशेष महत्त्व दिले जाते. परंतु, दरवर्षी 14 जानेवारीला साजरी होणारी मकर संक्रात आगामी म्हणजेच 2023 सालाच्या कॅलेंडरमध्ये 15 तारखेला नमूद केली आहे. यामुळे तारखेबाबत लोक संभ्रमात आहे.

ज्येष्ठ पंडितांच्या म्हणण्यानुसार, यावेळी मकर संक्रांती 14 ऐवजी 15 जानेवारी 2023 रोजी साजरी केली जाईल. मकर संक्रांतीची सुरुवात 14 जानेवारी 2023 रोजी रात्री 8.43 वाजता होईल. मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त 15 जानेवारी रोजी सकाळी 06:47 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 5:40 वाजता समाप्त होईल. दुसरीकडे, महापुण्य काल सकाळी 7 वाजून 15 मिनीट ते 9 वाजून 6 मिनीटांपर्यंत असेल. उदयतिथीनुसार, यावेळी मकर संक्रांती 15 जानेवारी 2023 रोजीच साजरी केली जाईल. या काळात स्नान करणे आणि दान करणे शुभ मानले जाते.

makar sankranti
Rudraksh Niyam: रुद्राक्ष धारण केल्यानंतर 'या' गोष्टी लक्षात ठेवा

पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार आणि तामिळनाडूमध्ये नवीन पिके घेण्याची ही वेळ आहे. म्हणूनच शेतकरी हा दिवस कृतज्ञता दिवस म्हणूनही साजरा करतात. या दिवशी तीळ आणि गुळापासून बनवलेल्या मिठाईचे वाटप केले जाते. याशिवाय मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचीही परंपरा आहे.

makar sankranti
आज वर्षातली शेवटची अमावस्या; जाणून घ्या महत्व
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com