Lokmanya Tilak Mukta Tilak
Lokmanya Tilak Mukta Tilak Team Lokshahi

ज्या मुक्ता टिळकांची सध्या चर्चा होतीय त्यांचे लोकमान्य टिळकांशी नाते तुम्हाला माहिती आहे का?

राज्यात नुकताचं विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर आता राज्यात चर्चा होती ती म्हणजे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची.

- सागर प्रधान (राजकीय प्रतिनिधी)

राज्यात नुकताचं विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर आता राज्यात चर्चा होती ती म्हणजे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची. कसबा मतदारसंघातून भाजप आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडमधून भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. त्यामुळे आता या निवडणुका जाहीर झाल्या. परंतु, आता या दोन्ही जागांपैकी एका जागेची प्रचंड चर्चा होत आहे ती म्हणजे कसबा जागेची या ठिकाणी जागेवरून प्रचंड राजकीय गदारोळ पाहायला मिळतो. सोबतचं त्याठिकाणच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्याबद्दल देखील प्रश्न पडलेला पाहायला मिळतो.

Lokmanya Tilak Mukta Tilak
टिळकांना उमेदवारी दिल्यास निवडणूक बिनविरोध करणार का? चंद्रकांत पाटलांचा सवाल

मुक्ता टिळक यांच्या आडनावावरून सर्वांना प्रश्न पडतो की, लोकमान्य टिळक आणि मुक्ता टिळक यांचे काही नाते आहे का? तर त्याबाबतच आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. लोकमान्य टिळक हे भारताच्या स्वतंत्र लढ्यात अग्रेसर असलेले नाव. लोकमान्य टिळकांना तीन मुली आणि तीन मुलं होते. त्यातील थोरला मुलगा फार कमी वयातच वारला. त्यामुळे पाच अपत्यं राहिली. तिन्ही मुलींचे टिळकांनी हयात असतानाच लग्न लावून दिले. उरलेली दोन मुलं म्हणजे रामभाऊ आणि श्रीधरपंत हे टिळकांच्या शेवटच्या काळात शिक्षण घेत होते.

यातील श्रीधरपंत अभ्यासात सुरुवातीला फारसे हुशार नव्हते. मात्र, टिळकांच्या निधनानंतर त्यांनी पुरोगामी चळवळीत मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला. वयाच्या 32 व्य वर्षी श्रीधरपंतांची जीवनयात्रा संपली. मात्र, तोवर त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेकांशी मैत्री केली होती. 15 मे 1920 रोजी विनायक विष्णू बापट यांच्या भाचीशी म्हणजे शांताबाईशी श्रीधरपंतांचं लग्न झालं. लग्नावेळी श्रीधरपंत बीएच्या वर्गात शिकत होते. जयंत, कालिंदी, रोहिणी अशी अपत्ये श्रीधरपंत हयात असताना, त्यांनीनंतर श्रीधरपंत यांनी आत्महत्या केली. मात्र त्याचवेळी त्यांच्या पत्नी शांताबाई ह्य गरोदर होत्या. श्रीधरपंतांच्या निधनानंतर काहीच दिवसात श्रीकांत हा मुलगा झाला. अशी एकूण चार मुलं श्रीधरपंतांना झाली.

Lokmanya Tilak Mukta Tilak
तर आम्ही टिळकांना उमेदवारी देऊ; चंद्रशेखर बावनकुळेंच मोठं वक्तव्य

त्यानंतर आज राजकारणात सक्रिय आहेत ते याच श्रीधरपंत यांचे मुले असणारे जयंत टिळक आणि श्रीकांत टिळक यांची पिढी. जयंतराव टिळक यांना पुढे लोकमान्य टिळक यांनी सुरु केलेल्या केसरीचे संपादक भूषविले तर दुसरे पुत्र श्रीकांत टिळक हे फार काही चर्चेत आले नाही. जयंतराव टिळक यांचा मुलगा दीपक टिळक तर श्रीकांत टिळकांचे पुत्र म्हणजेच मुक्ता टिळकांचे पती शैलश टिळक हे आहेत. मुक्ता टिळक यांचे लोकमान्य टिळकांशी नातसूनेचे नातं होते. शैलेश टिळक आणि मुक्ता टिळक यांना एक मुलगा एक मुलगी आहे. मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पश्चात मुलगा रोहित टिळक यांना उमेदवारी मिळेल असे वाटत होते मात्र, तसे काही होऊ शकले नाही. भाजपने दुसऱ्या व्यक्तीला उमेदवारी देत रोहित टिळक यांना राज्य प्रवक्ते पद दिले आहे. तर अशाप्रकारे टिळकांची ही पिढी राजकारणात सक्रिय आहे. परंतु, या कुटुंबाबाबत चर्चा होत नसल्याचे कायम दिसून येते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com