उपांत्य फेरीच्या सामन्यातून रोहित शर्मा बाहेर?

उपांत्य फेरीच्या सामन्यातून रोहित शर्मा बाहेर?

टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये गुरुवारी (१० नोव्हेंबर) होणाऱ्या उपांत्य फेरीतील सामन्याआधीच भारतीय टीमसाठी एक धक्कादायक माहिती येत आहे.

टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये गुरुवारी (१० नोव्हेंबर) होणाऱ्या उपांत्य फेरीतील सामन्याआधीच भारतीय टीमसाठी एक धक्कादायक माहिती येत आहे. सामन्यापूर्वी सराव सुरु असतानाच रोहित नेट्समध्ये बॅटिंग करत असताना त्याच्या उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली. भारतीय संघ सध्या उपांत्य फेरीतील सामन्याआधी सराव करत असून याच सरावादरम्यान एक उसळी घेणारा चेंडू रोहितच्या उजव्या हाताला लागला. यानंतर रोहितने सराव थांबवला. मात्र ही जखम किती गंभीर आहे याची माहिती सध्या समोर आलेली नाही.

याता रोहीत शर्मा खेळेल की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुखापत किती गंभीर आहे यावर अंतिम निर्णय घेतला जाईल अशीही चर्चा आहे.रोहितला दुखापत झाल्यानंतर त्यानं लगेचच सराव थांबवण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर टीम इंडियाचा हा कर्णधार तडक ड्रेसिंग रुममध्ये गेला.

दरम्यान दीड ते दोन तासांचा ब्रेक घेतल्यानंतर रोहित पुन्हा सरावासाठी नेट्समध्ये दिसून आला. रोहितची दुखापत गंभीर नसावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. रोहितला नेमकी काय दुखापत झाली आहे यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियमन मंडळाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com