Sikandar Shaikh
Sikandar ShaikhTeam Lokshahi

सिकंदर शेखने पटकावला छत्रपती शिवाजी महाराज चषक; पंजाबच्या पैलवानाला दाखवले असमान

सांगलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पार पडलेल्या कुस्ती मैदानामध्ये भारत केसरी सिकंदर शेख याने मैदान मारले आहे.

संजय देसाई | सांगली : सांगलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पार पडलेल्या कुस्ती मैदानामध्ये भारत केसरी सिकंदर शेख याने मैदान मारले आहे. रोमहर्षक अशा झालेल्या कुस्तीमध्ये पैलवान सिकंदर शेख यांने पंजाबाच्या भारत केसरी गोपी पंजाबला चितपट केले आहे.

Sikandar Shaikh
टी-20 वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा आफ्रिकेवर विजय; सलग सहाव्यांदा कोरले वर्ल्डकपवर नाव

ट्रबल शुटींग सोशल वेलफेअर फाऊंडेशन व कुस्ती प्रेमी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमान शहरात भव्य कुस्तीचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये छोट्या-मोठ्या अशा 100 कुस्त्या पार पडल्या. यामध्ये पैलवान सिकंदर शेख विरूध्द पंजाबचा पै.गुरुप्रित सिंग उर्फ गोपी पंजाब यांच्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती पार पडली. यामध्ये काही क्षणातच सिकंदर शेखने गोपी पंजाबला आसमान दाखवले व चितपट करत छत्रपती शिवाजी महाराज चषक पटकावले आहे.या कुस्त्या स्पर्धा पाहण्यासाठी हजारो कुस्ती शौकिनांनी मोठी गर्दी केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com