ICC
ICCTeam Lokshahi

आयसीसीने केला क्रिकेटच्या नियमांत मोठा बदल, T20 विश्वचषकावर होणार परिणाम

आयसीसीचे नवे नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार
Published by :
Sagar Pradhan

पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात आयसीसी टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता आयसीसीने क्रिकेटच्या नियमात काही महत्वाचे बदल केले आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती कळवली आहे. आयसीसीने बदल केलेल्या या नव्या नियमाची अमंबलजावणी 1 ऑक्टोबर 2022 पासून करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात होण्याऱ्या पुरुष आयसीसी विश्वचषकात हे नियम लागू होणार आहेत. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली पुरुष क्रिकेट समितीनं मेरीलेबोन क्रिकेट क्लबनं महिला क्रिकेट समितीशी केलेल्या नियमांवर चर्चा केली होती. त्यानंतर नियमांत बदल करण्यात आलाय.

ICC
T20 World Cup: भारतानंतर पाकिस्तानने जाहीर केला वर्ल्ड कपसाठी संघ

असे असतील नवे नियम

1. कोरोना महामारीच्या चेडूंवर थुंकी लावण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता हा नियम पुढं कायम ठेवत, चेंडूवर थुंकी लावण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे.

2. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये फलंदाजाला दोन मिनिटांच्या आत स्ट्राइक घ्यावा लागेल. तर, टी-20 मध्ये त्याची वेळ मर्यादा 90 सेकंद आहे. यापूर्वी एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानात येणाऱ्या दुसऱ्या फलंदाजाला कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन मिनिटे मिळायची. फलंदाज दोन मिनिटाच्या आत स्ट्राईक घेऊ न शकल्यास विरोधी संघाचा कर्णधार टाईम आऊटची मागणी करण्यास पात्र असेल.

3. चेंडू खेळपट्टीबाहेर पडल्यास त्याला डेड म्हणून घोषित केला जाईल. तसेच फलंदाजाला खेळपट्टी सोडण्यास भाग पाडणारा कोणताही चेंडू नो-बॉल ठरवला जाईल.

4. गोलंदाजाच्या गोलंदाजी (रनअप) दरम्यान क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या खेळाडूंकडून काही अयोग्य वर्तन किंवा जाणूनबुजून चुकीची हालचाल करण्यात आली. तर, पंच या चेंडूला डेड बॉल ठरवतील. तसेच फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यात 5 धावा जमा होतील.

5. जर गोलंदाजानं गोलंदाजी करण्यापूर्वी नॉन-स्ट्रायकर क्रीझमधून बाहेर पडला आणि गोलंदाजानं फलंदाजाला रनआऊट केल्यास त्याला बाद घोषित केलं जाईल. यापू्र्वी असं केल्यास अनफेयर प्ले मानलं जायचं.

6. टी-20 प्रमाणेच आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही षटक वेळेवर पूर्ण न झाल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 30 यार्डच्या आत अतिरिक्त एक फिल्डर ठेवावा लागेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com