T20 World Cup
T20 World CupTeam Lokshahi

T20 World Cup : पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेच्या विजयानंतर भारतीय संघाचे टेन्शन वाढणार का?

काल झालेल्या पाकिस्तान विरूद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यामध्ये पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा 33 धावांनी पराभव केला. आता पाकिस्तानने हा सामना जिंकून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहचली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाचं टेन्शन वाढणार आहे.
Published by :
shamal ghanekar
Published on

टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलची रेस ही अधिक रोमांचक झाली आहे. काल झालेल्या सामन्यामध्ये पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा 33 धावांनी पराभव केला. आता पाकिस्तान हा सामना जिंकून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहचली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाचं टेन्शन वाढणार आहे. कारण नेदरलँड आणि झिम्बाब्वे संघाने एक-एक सामना जिंकला तर अजूनही पाकिस्तान संघाचा सेमी फायनलमध्ये समावेश होऊ शकतो.

6 नोव्हेंबरला भारत विरूद्ध झिम्बाब्वे हा सामना होणार आहे. भारताला सेमी फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर झिम्बाब्वेविरुद्धचा अखेरचा सामना भारताला जिंकणे आवश्यक आहे. हा सामना भारताने जिंकला तर भारत पहिल्या स्थानावर राहणार आहे.

पण, भारताचा झिम्बाब्वे संघाने पराभव केला तर भारताला सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी बांगलादेश संघाने पाकिस्तानला हरवणे गरजेचे आहे किंवा नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिका संघाचा पराभव केला पाहिजे. तरच भारत संघ सेमी फायनलमध्ये पोहचू शकतो.

T20 World Cup
T20 World Cup : विराट कोहलीवर 'बनावट क्षेत्ररक्षण' केल्याचा आरोप...

टी-20 विश्वचषकामधील ग्रुप 2 मधील प्रत्येक संघाचे 4 सामने झाले आहेत. तर प्रत्येक संघाचा एक-एक सामना बाकी आहे. टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलची रेसमधून नेदरलँड आणि झिम्बाब्वे बाहेर गेले आहेत. मात्र ग्रुप 2 मधील भारत, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि बांगलादेश अजूनही सेमी फायनलच्या रेसमध्ये स्थान मिळवू शकतात. त्यामुळे टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलची रेस ही अधिक रोमांचक झाल्याचे दिसत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com