IND vs NZ OD Series
IND vs NZ OD Series Team Lokshahi

टी-20 नंतर भारतीय संघाचे लक्ष वनडे मालिकेकडे; कोण मारणार बाजी

भारतविरूद्ध न्यूझीलंड यांच्यामधील पहिला सामना उद्या म्हणजे शुक्रवारी (25 नोव्हेंबरला) ऑकलंड येथे खेळला जाणार आहे.

टी 20 मालिकेनंतर आता भारतीय संघ एकदिवसीय सामना खेळणार आहे. एकदिवसीय सामन्यामध्ये भारतीय संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे सोपवण्यात आले आहे. भारतविरूद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये 3 एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. भारतविरूद्ध न्यूझीलंड यांच्यामधील पहिला सामना उद्या म्हणजे शुक्रवारी (25 नोव्हेंबरला) ऑकलंड येथे खेळला जाणार आहे.

भारतविरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये (IND vs NZ) झालेल्या पहिला टी20 सामन्यामध्ये पाऊस पडल्याने हा सामना अनिर्णीत ठरला. तर दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने न्यूझीलंड 65 धावांनी विजय मिळवला आहे. तर तिसऱ्या सामन्यामध्ये पाऊस पडल्यामुळे हा सामनाही अनिर्णीत झाला. त्यामुळे 1-0 ने भारताने मालिका जिंकली आहे.

IND vs NZ OD Series
IND vs NZ : दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय

न्यूझीलंडविरूद्धच्या वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे:

शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, शहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चाहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com