VIVO Pro Kabaddi
VIVO Pro KabaddiTeam Lokshahi

'या' खेळाडूंच्या नावावर आहेत कबड्डीत सर्वाधिक रेड पॉइंट्स, PKLमध्ये रचला नवा इतिहास

PKL मध्ये आतापर्यंत अधिक रेड पॉइंट मिळवणारे 'हे' चार खेळाडू आहेत.
Published by :
shamal ghanekar

सध्या प्रो कबड्डी लीगचा (PKL 2022) नववा हंगाम खूप धमाकेदार सुरू आहे. प्रो कबड्डी लीगच्या या हंगामात सर्वच खेळाडू चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. तर काही अटीतटीचे सामने पाहायला मिळत आहेत. प्रो कबड्डी लीग 2022 मध्ये आतापर्यंत चार रेडर्सनी 150 हून अधिक रेड पॉइंट्स मिळवले. तर सर्वात जास्त रेड पॉइंट्स मिळवून बेंगळुरू बुल्समधील भरत हा एक नंबरवर आहे. भरतने 186 रेड पॉइंट्स मिळवण्यात यश मिळाले आहे.

जर आपण PKL च्या सर्व हंगामांबद्दल बोलयचे झाले तर अनेक रेडर्सने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आणि अजूनही करत आहेत. PKL मध्ये आतापर्यंत अधिक रेड पॉइंट मिळवणारे चार खेळाडू आहेत. त्या खेळाडूंच्या नावावर 1000 पेक्षा जास्त रेड पॉइंट आहेत. तर चला मग त्यांच्याबद्दल जाणून घेऊ या.

Pardeep Narwal
Pardeep Narwal

प्रो कबड्डीमधील यशस्वी रेडर प्रदीप नरवाल याने 146 सामन्यांमध्ये 1495 रेड पॉइंट्स आपल्या नावावर केले आहे. याआधी प्रदीप नरवाल बेंगळुरू बुल्स, पाटणा पायरेट्स आणि आता यूपी योद्धाचा कर्णधार म्हणून खेळताना पाहत आहोत.

VIVO Pro Kabaddi
IND vs NZ : दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय
Maninder Singh
Maninder Singh

PKL मधील बंगाल वॉरियर्सचा कर्णधार मनिंदर सिंह 115 सामन्यांमध्ये 58 सुपर 10सह 1152 रेड पॉइंट्स मिळवण्यात त्याला यश मिळाले आहे. याआधी PKL च्या पहिल्या हंगामात जयपूर पिंक पँथर्सचा भाग होता.

Rahul Chaudhari
Rahul Chaudhari

राहुल चौधरी याने 144 सामन्यांमध्ये 41 सुपर 10सह 1018 रेड पॉइंट्स मिळवले. आता राहुल चौधरी जयपूर पिंक पँथर्सच्या संघातून खेळताना दिसत आहे. याआधी राहुल चौधरी तेलुगु टायटन्स, तमिळ थलायवास आणि पुणेरी पलटण संघाचा भाग होता.

Deepak Niwas Hooda
Deepak Niwas Hooda

दीपक निवास हुड्डा याने 35 सुपर 10 च्या मदतीने 154 सामन्यांमध्ये 1015 रेड पॉइंट आपल्या नावावर केले आहेत. तर दीपक हुड्डा यावर्षीच्या हंगामामध्ये बंगाल वॉरियर्सकडून खेळत आहे. दीपक हुड्डा PKL मधील बंगाल वॉरियर्स संघाच्या आधी तेलगू टायटन्स, पुणेरी पलटण आणि जयपूर पिंक पँथर्सच्या संघांतून खेळला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com