Virat Kohli And Anushka Sharma
Virat Kohli And Anushka SharmaTeam Lokshahi

विराट-अनुष्काने भाड्याने घेतला फ्लॅट, भाडं ऐकून व्हाल थक्क

नुकतेच भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा उत्तराखंड राज्याला भेट दिली होती.

नुकतेच भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा उत्तराखंड राज्याला भेट दिली होती. त्यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी मुंबईतल्या जुहू येथे एक फ्लॅट भाड्याने घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या फ्लॅटचं भाडं 2.76 लाख रुपये आहे. तर या घराच डिपॉझिट साडेसात लाख रुपये आहे. तसेच विराटने भाड्याने घेतलेल घर हे माजी क्रिकेटपटू समरजीत सिंह गायकवाड याचे आहे.

विराटने भाड्याने घेतलेला फ्लॅट जुहू समुद्रकिनाऱ्यापासून जवळ आहे. विराट-अनुष्काने मुंबईतल्या जुहू येथे एक फ्लॅट भाड्याने घेतला असून या फ्लॅटमध्ये कधी राहायला जाणार आहे याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Virat Kohli And Anushka Sharma
Fifa World Cup 2022 : बलाढ्य अर्जेंटिनाचा सौदी अरेबियाकडून पराभव

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीच्या नावावर अनेक रेकॉर्ड असून विराट कोहली मागच्या काही दिवसापासून आणि विश्वचषक स्पर्धेत सुद्धा चांगली कामगिरी करताना दिसत आहे. विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यानंतर क्रिकेट प्रेमींकडून त्याचे कौतुक केल जात आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com