8 मुली झाल्यानं नवऱ्याची दुसऱ्या लग्नाची तयारी;
बायको चिडली अन्...

8 मुली झाल्यानं नवऱ्याची दुसऱ्या लग्नाची तयारी; बायको चिडली अन्...

पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डीमध्ये पत्नीने पतीला मारण्याची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पुणे : पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डीमध्ये पत्नीने पतीला मारण्याची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आठही मुली झाल्याने पतीकडून सातत्याने पत्नीला त्रास होता आणि त्याची दुसरे लग्न करण्याची तयारी असल्याचा सुगावा पत्नीला लागल्याने तिने हे कृत्य केल्याचे उघड झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीसह दोन आरोपींना अटक केली आहे.

8 मुली झाल्यानं नवऱ्याची दुसऱ्या लग्नाची तयारी;
बायको चिडली अन्...
पीएचडीच्या 'त्या' वक्तव्यावरुन अजित पवार यांचे स्पष्टीकरण; म्हणाले, माझ्या विधानाचा...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीला मुलगा हवा होता, पण आठही मुली झाल्या. त्यामुळे पती सातत्याने पत्नीवर राग राग करत असे. त्यामुळे पत्नी संतापली आणि याच संतापाच्या भरात तिने त्याच्यावर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला. त्यानंतर तिने शेजारीच राहणाऱ्या शिवम दुबे आणि अमन पुजारी यांना पाच लाखांची सुपारी दिली आणि दोन लाख रोख दिले. त्यानंतर त्या दोघांनी पतीवर हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले.

त्यानंतर मुलीने याबाबत निगडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला. निगडी पोलिसांनी आठ तासांच्या आत गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यानंतर तपासात पत्नीनेच ही सुपारी दिल्याचे समोर आले. त्यानुसार निगडी पोलिसांनी पत्नीसह दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com