Marathi Sahitya Sammelan: साताऱ्यात 99 वं मराठी साहित्य संमेलन पार पडणार, निमंत्रण पत्रिकेत पवारांचं नावच नाही
99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध झाली असून संमेलनाचे स्वागताध्यक्ष मंत्री शिवेंद्रराजे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत 1 जानेवारी ते 4 जानेवारी या दरम्यान हे संमेलन पार पडत असून याची तयारी सुरू झाली आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच हे साहित्य संमेलन होत आहे. शतकपूर्तीच्या आधीचे हे संमेलन होत असल्यामुळे यावेळी तीन दिवसा ऐवजी होणार आहे. त्यामुळे या साहित्य संमेलनात पहिल्यांदाच नाटक, फॉक व्याख्यान, हास्य जत्रेचा कार्यक्रम त्याचबरोबर विविध कार्यक्रम या चार दिवसात घेण्यात येणार असल्याचे देखील मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितलं
निमंत्रण पत्रिकेमध्ये शरद पवार यांचे नाव आणि निमंत्रण नसल्या बाबत विचारले असता ते म्हाणाले की, हे माझं एकट्याचं संमेलन नाही. सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं हा या मागचा उद्देश आहे त्यानुसार आम्ही सर्वांना याचे निमंत्रण देणार आहोत.
यामध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांमधील शरद पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, श्रीनिवास पाटील यांना देखील निमंत्रण देणार आहोत. जे पदावर आहेत . त्यांची नावे पत्रिकेमध्ये घातली आहेत. हे संमेलन कोणाही एकट्याचे नाही यामध्ये आम्ही सर्वांना निमंत्रण देणार असल्याचे यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.
