Accident | खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दोन ट्रकचा मोठा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

Accident | खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दोन ट्रकचा मोठा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

अमरावती औरंगाबाद महामार्गावर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिंगणापूर फाट्यावर दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला.
Published by :
Team Lokshahi

सुरज दाहाट | अमरावती : अमरावती ( Amravati ) औरंगाबाद महामार्गावर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिंगणापूर फाट्यावर दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोघांचे मृत्यूदेह ट्रक मधून काढण्यात पोलिसांना यश आले असून अद्यापही दोघांचे मृतदेह ट्रकमध्ये फसून आहे. तर अपघातानंतर सुमारे दहा ते वीस किलोमीटरच्या रांगा लागलेले आहे.

Accident | खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दोन ट्रकचा मोठा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू
कर्ज पुन्हा महागलं; रेपो रेटमध्ये 50 बेसिसची वाढ

शिंगणापूर फाट्यावरून पाचशे मीटर अंतरावर आर जे 04 जीसी 2258 क्रमांकाचा ट्रक नागपूरकडून औरंगाबाद कडे जात होता तर सीजी 04 एच झेड 8154 क्रमांकाचा ट्रक औरंगाबाद कडून नागपूरकडे जात होता. मात्र या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याने खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Accident | खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दोन ट्रकचा मोठा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू
Har Ghar Tiranga: तिरंग्याच्या मागणीत दहापटीने वाढ

एका ट्रकमध्ये सलाखी इतर दुसऱ्या ट्रकमध्ये कांदे होते, मात्र दोन्ही ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाल्याने दोन ट्रक मधील दोघांच्या अंगावरून आर-पार सलाखी गेल्यात यामध्ये चौघांचा जागेवरच मृत्यू झाला, रात्री उशिरा पोलिसांना माहिती मिळतात पोलीस रात्रीपासूनच घटनास्थळी दाखल झाले मात्र दोन्ही ट्रक रस्त्यावर आडवे झाल्याने या ठिकाणी सुमारे दहा ते वीस किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे,तर आतापर्यंत ट्रकमध्ये फसलेल्या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून अद्यापही दोन जणांचे मृत्यू ट्रकमध्ये फसून आहे पोलीस शर्तीचे प्रयत्न करत असून मात्र अद्यापही मृत्यूदेह काढण्यात पोलिसांना यश आले नाही घटनास्थळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी नांदगाव खंडेश्वर, मंगरूळ चव्हाळा, बडनेरा व तळेगाव दशासर येथील पोलीस घटनास्थळी आहे,तर मृत्यू झालेल्या चारही जणांचे नाव कळू शकले नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com