लोकशाहीवरील कारवाईनंतर ऑल इंडिया पॅंथर सेना आक्रमक, राज्यभर देणार निवेदन
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओप्रकरणी तपास सुरु असतानाच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने लोकशाही मराठी न्यूज चॅनलला नोटीस बजावत 72 तासांसाठी लोकशाही मराठी न्यूज चॅनेल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. यावरच आता ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी निषेध व्यक्त केला आहे.
प्रसार माध्यमांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलायचं की नाही असं म्हणत देशात पुन्हा एकदा हिटलरशाही पाहायला मिळतीये अशी भावना उपस्थित करत ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी शेतकरी बेरोजगार आणि महागाईच्या प्रश्नावर आवाज उठवणे गुन्हा आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
तसेच सरकारच्या दादागिरी, हुकूमशाहीला मुर्दाबाद करत राज्यभर अभिव्यक्ती बचाव असे निवेदन जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयात देण्यात येणार आहे, गोदी मीडियाच्या विरोधात जाऊन लोकशाहीनं सुरू केलेला सत्याचा संघर्ष असाच कायम राहावा यासाठी दीपक केदार यांनी #सपोर्ट लोकशाही चॅनल आणि #सपोर्ट कमलेश सुतार हा ट्रेंड सुरू केला आहे.
दरम्यान,विधान परीषेदचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी लोकशाही मराठीला लोकशाहीला मार्गाने न्याय मिळवून दिला पाहीजे. बातमी चुकीची असेल तर त्याचे खंडण केले पाहीजे पण लोकशाही मराठी चॅनेलवर अशी कारवाई कशी करु शकता. लोकशाही मराठीला नक्की न्याय्य मिळेल अशी प्रतिक्रिया दिली आहे.