लोकशाही मराठी चॅनलविरुद्ध केलेल्या कारवाईवर दानवे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओप्रकरणी तपास सुरु असतानाच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने लोकशाही मराठी न्यूज चॅनलला नोटीस बजावत 72 तासांसाठी लोकशाही मराठी न्यूज चॅनेल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. यावर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अंबादास दानवे म्हणाले की, लोकशाही मराठीला लोकशाहीला मार्गाने न्याय मिळवून दिला पाहीजे. बातमी चुकीची असेल तर त्याचे खंडण केले पाहीजे पण लोकशाही मराठी चॅनेलवर अशी कारवाई कशी करु शकता. लोकशाही मराठीला नक्की न्याय्य मिळेल अशी प्रतिक्रिया विधान परीषेदचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिली.
दरम्यान त्यांनी आज पत्रकार परिषदेत कोणत्याही चॅनलवर बंदी घालण चुकीचं.अनेक चॅनल आहेत. यांचा अर्थ या चॅनलने फक्त सरकारची तडी उचलली पाहिजे. सरकारचे गोडवे गायले पाहिजे. अशा प्रकारची मानसिकता निर्माण करत असेल तर जनता ही सर्वश्रेष्ठ आहे. लोकशाहीवर बंदी घालणं ही हूकुमशाही असल्याचं ते म्हणाले आहे.
दरम्यान, संजय राऊतांनी लोकशाही न्यूजवरील या कारवाईचा ट्विटरवरुन एका शब्दात निषेध केला आहे. आणीबाणी, लिहीत संजय राऊतांनी टीका केली आहे. तर, अंबादास दानवेंनीही प्रतिक्रिया देत सरकारने याची चौकशी केली की नाही केली हे खोटं आहे का खरं आहे? याबद्दल स्पष्टता नसताना सरकारने लोकशाही चॅनलवर कारवाई करणे ही भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकारची दादागिरी आहे. माध्यमांवरील ही दादागिरी मला असं वाटतं लोकशाहीमध्ये हे खूप मोठे घातक आहे. यावर जनता आवाज उठवेल, अशी टीका त्यांनी केली आहे