Tejashree Karanjule
AMBERNATH ELECTION 2025: BJP WINS MAYOR POST, TEJASHREE KARANJULE SCORES BIG VICTORY

Ambernath Election 2025: अंबरनाथ नगरपरिषदेवर भाजपाचा झेंडा, भाजपाच्या तेजश्री करंजुळे यांचा दणदणीत विजयी

Tejashree Karanjule: अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुळे यांनी दणदणीत विजय मिळवत नगराध्यक्षपद पटकावले.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

अंबरनाथ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने आपला झेंडा फडकावला आहे. भाजपच्या तेजश्री करंजुळे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत ही प्रतिष्ठेची लढत जिंकली. शिवसेना शिंदे गटाकडून मनीषा वाडेकर यांच्याविरुद्ध ही अटीतटीची जंग होती. दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला असून, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या जाहीर सभांमुळे ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची बनली होती.

Tejashree Karanjule
Malvan Kankavli Election: मालवण–कणकवलीत ‘राणे विरुद्ध राणे’ लढतीचा शेवट; निलेश राणेंचा विजय, पण परिवाराचा धागा कायम

अंबरनाथ शहरात महायुतीतील मित्रपक्षांमध्ये थेट सामना पाहायला मिळाला. तेजश्री करंजुळे यांनी मतदारांचा विश्वास संपादन करत नगराध्यक्षपद खेचून आणले. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. शहरात विजयोत्सव साजरा करण्यात आला असून, मशाल जुलूस काढले गेले. कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आनंद व्यक्त केला.

Tejashree Karanjule
Nanded Election 2025: नांदेडच्या भोकर आणि मुदखेड नगर परिषदेत भाजपचा झेंडा, भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

या विजयाने भाजपला अंबरनाथमध्ये मजबूत पाया मिळाला आहे. तेजश्री करंजुळे यांनी विजयानंतर सांगितले की, जनतेच्या विकासाकडे असलेल्या अपेक्षेला आम्ही उत्तर देऊ. नागरी सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छता या मुद्द्यांवर काम करणार आहोत. या निवडणुकीत महायुतीची एकजूट दिसली तरी अंतिम टप्प्यात भाजपने वर्चस्व सिद्ध केले.

Tejashree Karanjule
Municipal Elections: सून जिंकली, सासू हरली… भाऊ जिंकले, बहिणीही सोबत! नगर परिषद–नगर पंचायत निवडणुकीत नात्यागोत्यांची कसोटी

महायुती सरकारच्या नेत्यांच्या सभांनी या निवडणुकीला राजकीय रंग दिला होता. या यशामुळे भाजपला स्थानिक पातळीवर आत्मविश्वास वाढला असून, येत्या महापालिका निवडणुकांसाठी हे मोठे बळकटीकरण मानले जात आहे. तेजश्री करंजुळे यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथचा विकास वेगाने होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Summary
  • अंबरनाथ नगरपरिषदेवर भाजपाचा झेंडा

  • तेजश्री करंजुळे नगराध्यक्षपदी विजयी झालेल्या आहेत

  • शिवसेना शिंदे गटाला धक्का बसला आहे

  • भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळत आहे

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com