MINIMUM TEMPERATURES DROP, FOG AND CHILLY WINDS AFFECT FARMERS AND DAILY LIFE
MINIMUM TEMPERATURES DROP, FOG AND CHILLY WINDS AFFECT FARMERS AND DAILY LIFE

Maharashtra Cold Wave: महाराष्ट्रात शीतलहरी सक्रिय; अनेक जिल्ह्यांत किमान तापमानात मोठी घसरण

Winter In Maharashtra: महाराष्ट्रात शीतलहरी सक्रिय असून नाशिक, धुळे, परभणीसह इतर जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात मोठी घसरण. धुके, थंड वारे आणि शेतांवर परिणाम होत आहेत.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

राज्यातील किमान तापमानात घट झाल्याने तुरळक ठिकाणी थंडीची लाट आहे. उर्वरित राज्यात देखील थंडी वाढल्याचे दिसून येतेय. राज्यातील किमान तापमानात हळूहळू वाढ होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. तरीही थंडी कायम राहणार असल्याची शक्यता देखील वर्तवली आहे. उत्तर भारतात थंडी वाढत आहे. त्यामुळे राज्यात शीत लहरी वाढल्या आहेत. वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. यासोबतच वायू प्रदूषण प्रचंड वाढले असून नागरिकांच्या आरोग्याच्या समस्याही निर्माण झाल्या आहेत. देशात काही ठिकाणी कडाक्याची थंडी बघायला मिळत आहे तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळमधील काही भागात सध्या पाऊस आहे.

 MINIMUM TEMPERATURES DROP, FOG AND CHILLY WINDS AFFECT FARMERS AND DAILY LIFE
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे प्रकरणात शिक्षेला स्थगितीसाठी जोरदार युक्तिवाद; राहुल गांधी व अफजल अन्सारी प्रकरणांचा दाखला

नाशिकच्या निफाड तालुक्याचा किमान तापमानाचा पारा घसरला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे निफाड तालुका गारठला. तालुक्यातील रुई येथे 4.07 अंश सेल्सिअस तर कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 4.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. या वाढत्या थंडीमुळे लासलगाव येथील शिवनदीवर बाष्पयुक्त धूके पडले. पाण्यावरील बाष्पयुक्त धुक्यामुळे परिसरात नयनरम्य दृश्य. थंडीचा शेती पिकांवर ही परिणाम होत आहे. द्राक्षासाठी अपायकारक तर गहू हरवण्यासाठी पोषक थंडी.

धुळे येथे 5.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोद झाली. परभणी 6 अंश सेल्सिअस तापमान होते. 9 अंश सेल्सिअस तापमान गोदिंया, नाशिक, मालेगाव, जळगाव पुणे, नागपूर येथे नोंदवले गेले. बीड, परभणी, धुळे, निफाड येथे पुढील काही दिवसांमध्ये थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. मुंबईमध्येही सकाळच्या वेळी थंडी जाणवत आहे. दुपारी उन्हाचा कडाका बघायला मिळतोय.

 MINIMUM TEMPERATURES DROP, FOG AND CHILLY WINDS AFFECT FARMERS AND DAILY LIFE
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचा हप्ता लांबणीवर; जानेवारीत ₹४५०० मिळण्याची शक्यता

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 72 तासांत अनेक भागांमध्ये हलका ते जोरदार पाऊस पडू शकतो. तर पावसासोबत काही ठिकाणी हिमवृष्टी होण्याचीही शक्यता आहे. जम्मू आणि काश्मीर, मुझफ्फराबाद, लडाख येथे 21 डिसेंबर रोजी मुसळधार पाऊस होऊ शकतो. 22 डिसेंबर दरम्यान पंजाबच्या काही भागांमध्येही पाऊस पडू शकतो. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी अनेक राज्यांमध्ये दाट धुक्याचा इशारा दिला आहे. दाट धुके पंजाब, उत्तराखंड आणि बिहारमध्ये पडण्याची शक्यता आहे.

 MINIMUM TEMPERATURES DROP, FOG AND CHILLY WINDS AFFECT FARMERS AND DAILY LIFE
North Carolina Plane Crash: अमेरिकेत विमान कोसळले; दिग्गज खेळाडूच्या कुटुंबातील सदस्यांसह ७ जणांचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?
Summary
  • नाशिक, धुळे, परभणीसह अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 4 ते 9 अंश सेल्सिअसवर.

  • धुके आणि थंडीमुळे दैनिक जीवनावर परिणाम; शेतकरी काळजीत.

  • हवामान विभागानुसार पुढील 72 तासांत हलका ते जोरदार पाऊस शक्य.

  • उत्तर भारतात हिमवृष्टी, पंजाब, उत्तराखंड, बिहारमध्ये दाट धुक्याचा इशारा.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com