Breaking : अकोल्यात काँग्रेस व भाजपला धक्का; 300 कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Breaking) आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक पक्षप्रवेश होताना पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर अकोल्यात भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे.
यामध्ये भाजपचे राजेश घोगरे यांसह वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. आगामी अकोला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
या घडामोडीमुळे ठाकरे गटाची पक्षीय ताकद वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे. बाळापूरचे आमदार तथा उपनेते नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशात तब्बल 200 ते 300 महिला-पुरुष सहभागी झाले होते.
Summary
अकोल्यात काँग्रेस व भाजपला धक्का
300 कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश
हा पक्षप्रवेश भाजपसाठी मोठा धक्का
