Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Team Lokshahi

सत्तानाट्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर

मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे करणार पाहणी

राज्यात सध्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. अशातच अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन शेतींची पाहणी करत आहे. मात्र, आता त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उद्या औरंगाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्धव ठाकरे हे परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. शिवसेनेतील बंडखोरीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे दौऱ्यावर जाणार आहे.

Uddhav Thackeray
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेनेतून हक्कालपटी, बीडच्या राजकारणात खळबळ

शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा शिवसेनेचा बाल्लेकिल्ला समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या दौऱ्याकडे लागले आहे. मराठवाड्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. शेतकरी हतबल झाल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतात गेल्या चार दिवसांपासून गुडघ्याला लागेल इथपर्यंत पाणी तुंबले आहे. परतीच्या पावसाने मोठं नुकसान केलं असून शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याच अनुषंगाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत.

परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबादचा दौरा करणार आहेत. उद्या, रविवारी दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे यांचा पाहणी दौरा सुरू होणार आहे. यावेळी ठाकरे हे काही शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीची पाहणी करून ठाकरे शेतकऱ्यांसाठी पॅकेजची मागणी करण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com