Gauri Garje Case : घरासमोर अंत्यविधी करण्यावरुन वाद; गर्जे आणि पालवे यांच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Gauri Garje Case ) मंत्री पंकजा मुंडेंचे पीए गरजे यांच्या पत्नीने गळफास घेऊन जीवन संपवलं. वरळीच्या बिडीडी चाळीतील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नुकतेच आठ ते नऊ महिन्यापूर्वी गरजे दांपत्याचा विवाह झाला होता. मात्र पती यांचे अफेअर चालू असल्याने हा प्रकार झाला असल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या पोलिसांकडून या प्रकरणात तपास केला जात आहे. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप कुटुंबियांकडून केला आहे. गौरीला आत्महेत्येपूर्वी किरणच्या आधीच्या पत्नीचे गर्भवती असल्याची कागदपत्र मिळाल्याने ती अस्वस्थ होती ती कागदपत्रे आम्हाला पाठवली होती असा गौरीच्या वडिलांनी जबाब दिला असून तिच्या वडिलांनी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल डॉ गौरी गर्जे यांच्या आत्महत्येप्रकरणी पती, नणंद आणि दीरावर गुन्हा दाखल करण्यात आला. अनंत गर्जेला अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पत्नी डॉ. गौरी गर्जेच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर आज डॉ. गौरी गर्जेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. डॉ. गौरी गर्जेचे पार्थिव मोहोज देवेढे गावात दाखल झाले असून अनंत गर्जेच्या घरासमोर अंत्यसंस्कार करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र पती अनंत गर्जेच्या घरासमोर अंत्यविधी करण्यावरुन नातेवाईकांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. गर्जे आणि पालवे यांच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची झाली असून मोहोज देवढे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.
Summery
गौरीचं पार्थिव अहिल्यानगर जिल्ह्यातील मोहोज देवढे गावात दाखल
गर्जे आणि पालवे यांच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची
मोहोज देवढे गावात तणावपूर्ण वातावरण, पोलीस घटनास्थळी
