Gautami Patil : गौतमी पाटीलच्या वडिलांचं निधन
महाराष्ट्रातील लावणी डान्सर गौतमी पाटील हिच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलचे वडील बेवारस अवस्थेत धुळ्यात सापडले होते.
गौतमी पाटीलचे वडील रवींद्र बाबुराव पाटील हे काही दिवसांपूर्वी धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या सुरत बायपास रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत आढळून सापडले होते. त्यानंतर गौतमीने त्यांच्यावर पुण्यात उपचार करणार असल्याचं सांगितलं होतं. अखेर आज त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुण्यातील चिंतामणी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धनकवडी येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, गौतमी पाटील हिने पाटील आडनाव लावू नये यावरून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यानंतर तिच्या वडिलांची प्रतिक्रियाही समोर आली होती. यावेळी गौतमीने मला येऊ भेटावं, तिने मला पप्पा म्हणून हाक मारावी, अशी इच्छाही व्यक्त केली होती.