नंदुरबार जिल्ह्यात अवैध धंद्यांनी गाठला उच्चांक...
प्रशांत जव्हेरी, नंदुरबार
गुजरात मध्यप्रदेश राज्यांना जोडल्या जाणाऱ्या सीमेवर नंदुरबार जिल्हा वसलेला आहे. हा जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून राजकीय पातळीवर ओळखला जातो मागासलेल्या जिल्ह्यांच्या यादीत राज्यात नंदुरबारच्या प्रथम क्रमांक लागतो परंतु इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंदे देखील राज्यभरात तेवढेच परिचित आहेत.
नंदुरबार शहरासह पूर्ण जिल्ह्यात सट्टा बेटिंग, जुगार, दारू, पटला, या सारखे खेड या ठिकाणी दैनंदिन मोठ्या स्वरूपात सुरू आहेत सट्टा जुगार व अवैध दारू विक्रेत्यांनी कहरच केला असून एक प्रकारे पोलीस प्रशासनाला हाताशी धरून थैमानच घातल्याच्या प्रकार या जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे दिवसभर काबाडकष्ट करून हाती आलेला पैसा सर्वसामान्य गरीब व्यक्ती या सट्टा जुगार आणि दारू माफियांच्या घशात घालत असल्याचे विदारक चित्र येथे निर्माण झाले आहे.
कर्तव्यदक्ष आणि तेवढेच तत्पर असलेले पी आर पाटील नामक व्यक्तिमत्व नंदुरबारला पोलीस अधीक्षक म्हणून लाभले आहे. त्यांची कार्यप्रणाली चांगली असून जिल्हाभरात जाळे गेलेल्या अवैध धंद्यावर आवश्यक ती कारवाई करून हे राजरोसपणे चालणारे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद व्हावेत अशी अपेक्षा पोलीस अधीक्षकांकडे व्यक्त होत आहे जेणेकरून उद्ध्वस्त होणारे संसार त्यांच्या आगामी कारवाईने थांबतील अशी प्रमाणिक अपेक्षा देखील नागरिकांनी मनाशी वळवली आहे.