Raj Thackeray
Raj ThackerayTeam Lokshahi

आता पुण्यात असणार मनसेचे 'राज'दूत

महापालिका निवडणुकीसाठी मनसेने मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.
Published by :
Vikrant Shinde
Published on

अमोल धर्माधिकारी, पुणे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आगामी महापालिका निवडणुकांसाठी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. त्याच पार्श्वभुमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यामध्ये एक नवी संकल्पना राबवणार आहेत. पुण्यामध्ये आता 3,500 राजदूत नेमले जाणार आहेत.

Raj Thackeray
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर होणार बैठक; तोडगा निघणार का?

कशी असेल राजदुतांची रचना?

  • मनसेकडून पुण्यात राजदूत नेमले जाणार

  • पुण्यात ३,५०० राजदूत नेमले जाणार

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात लवकरच मेळावा घेणार

  • १ हजार मतदारांच्या पाठीमागे १ राजदूत काम पाहणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भातील आदेश मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांना दिले आहेत. लवकरच मनसेच्या या राजदुतांची नेमणूक होईल. आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर राज ठाकरेंसह मनसे ॲक्शन मोडवर आलेले दिसत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com