Heavy Rain Alert
Heavy Rain Alert

Heavy Rain Alert : अतिमुसळधार पावसाचा इशारा! हवामान विभागाने ४८ तासांसाठी 'या' राज्यांमध्ये अलर्ट

Weather Update: भारतीय हवामान विभागाने पुढील ४८ तासांसाठी अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

राज्यातील काही जिल्ह्यांत पारा १० अंशांच्या खाली गेल्याचे नोंदवले गेले आहे. राज्यात एकीकडे थंडी तर एकीकडे पाऊस अशी स्थिती निर्माण झाली आहे. मॉन्सून काही महिने झाले तरी देशभरात पाऊस थांबत नाही. यंदाचा पावसाळा अद्भुत राहिला आहे, देशभरात मुसळधार पाऊस पडला आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाचा इतर विक्रम मोडले आहेत. महाराष्ट्रातही अनेक भागांत अतिवृष्टी झाली आहे.

Heavy Rain Alert
Putin India Visit : राजेशाही स्वागत, खास डिनर अन् दीर्घ चर्चा... पुतिन यांचा भारतातील पहिला दिवस कसा गेला? वाचा A tO Z माहिती

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारठा आहे. १० अंशांच्या खाली पुन्हा पारा गेला आहे. पहाटे धुक्यासह थंडी वाढल्याची नोंद आहे. रत्नागिरीत ३४.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. चार दिवसांनंतर राज्यात पुन्हा थंडी वाढेल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काही भागांत ढगाळ वातावरण राहील.

Heavy Rain Alert
Donald Trump: भारताला सर्वात मोठा झटका, पुतिन भारतात असतानाच अमेरिकेतून ट्रम्पची मोठी घोषणा

भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील ४८ तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. केरळमध्ये मॉन्सूनमध्ये येताच सतत पाऊस सुरू आहे आणि हवा सुधारण्याचे नाव घेत नाही. सतत पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा अनुभव लोकांना अजूनही होत आहे.

Heavy Rain Alert
Indigo Flights: २ तास उशीर अन् मग ३ तासांनी फ्लाईट कॅन्सल..! अमोल कोल्हे म्हणाले...

आंध्र प्रदेशात अजूनही पाऊस पडत आहे. हवामान खात्याने पुढील ४८ तासांत आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच तामिळनाडू, तेलंगणातील काही भाग, कर्नाटक, लक्षद्वीप, पुद्दुचेरी, कराईकल, माहे, यानम आणि रायलसीमा इत्यादींमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या प्रदेशांमध्ये येणारा पाऊस पुढील दिवसांत सतत राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, ज्यामुळे लोकांनी आवश्यक ते नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Summary
  • IMD ने पुढील ४८ तासांसाठी महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि काही केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला.

  • मॉन्सूनमुळे अनेक भागांत तापमान घटले आहे; काही ठिकाणी पारा १० अंशांखाली गेला आहे.

  • सतत पावसामुळे विजांचा कडकडाट आणि ढगाळ वातावरण जाणवणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com