पंतप्रधानांच्या हस्ते समृध्दी महामार्गाचे लोकार्पण;  मोदींनी वाजविला ढोल

पंतप्रधानांच्या हस्ते समृध्दी महामार्गाचे लोकार्पण; मोदींनी वाजविला ढोल

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

नागपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. संपूर्ण राज्यासाठी भाग्यरेखा ठरणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ७२० किलोमीटरच्या अत्यंत महत्वाकांक्षी महामार्गाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले आहे. या रस्त्यावरून दहा किलोमीटर प्रवास पंतप्रधान मोदी करणार आहेत.

पंतप्रधानांच्या हस्ते समृध्दी महामार्गाचे लोकार्पण;  मोदींनी वाजविला ढोल
समृद्धी महामार्ग आहे तरी कसा? काय आहेत त्याची वैशिष्ट्ये? जाणून घ्या!

देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात सुरु झालेल्या समृध्दी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ढोल-ताशा व लेझीमच्या गजरात मोदींचे जंगी स्वागत करण्यात आले. यादरम्यान पंतप्रधान मोदींना ढोल वाजविण्याचा मोह आवरला नाही. यानंतर ते समृध्दी महामार्गावरुन दहा किलोमीटर प्रवास करणार आहेत.

पहिल्या टप्प्यातील नागपूर ते सेलूबाजार (वाशीम) हे 210 कि. मी. चे काम यावर्षीच्या प्रारंभी पूर्ण झाले. त्यानंतर वाशिम ते शिर्डी (292 कि. मी.) हा दुसरा टप्पासुद्धा पूर्ण झाला. यामुळे आता दोन्ही टप्प्यांचे एकत्रित उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते केले आहे. तिसरा टप्पा शिर्डी ते मुंबई (प्रत्यक्षात शहापूर) 2023 च्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याचा थेट लाभ 10 जिल्ह्यांना, तर अप्रत्यक्ष लाभ आणखी 14 जिल्ह्यांना होणार आहे.

महाराष्ट्रातील 10 जिल्हे, 390 गावातून जाणारा समृद्धी महामार्ग असणार आहे. दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ सात तासांपर्यंत कमी करेल. या प्रकल्पासाठी ५५,३५५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.५५,००० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणारा, समृद्धी महामार्ग बांधण्यासाठी सुमारे ९,९०० हेक्टर जमीन संपादित केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com