Indigo Airlines: मावळातील गुलाब शेतीला इंडिगोचा फटका, देशातील शेतकऱ्यांचे 10 कोटींचे नुकसान
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
मावळातील गुलाबशेतीला इंडिगो एअर लाईन्सच्या समस्येमुळे मोठा फटका बसला आहे. देशातील गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना सध्या अंदाजे 10 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. देशात दररोज सुमारे 40 लाख गुलाब फुलांची देशांतर्गत वाहतूक होते, त्यातील 25 टक्के म्हणजे 10 लाख फुले विमानाने पाठवली जातात.
मात्र, इंडिगो एअर लाईन्सच्या गोंधळामुळे या गुलाब फुलांची विविध विमानतळांवर विलंबानं आवक होणे किंवा पडणे यामुळे वितरकांपर्यंत वेळेवर पोहोचणे शक्य नाही. गुलाबाचे सध्या प्रति फुल 20 रुपयांचे दर असून, या अडचणीमुळे मागील पाच दिवसांत उत्पादकांना तब्बल 10 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या या आर्थिक तोट्याचा फटका कोण कसा भरणार याचा प्रश्न अबोल आहे आणि हा मुद्दा तातडीने सोडवण्याची गरज निर्माण झाली आहे.
