Ladki Bahin Yojana: महत्त्वाची बातमी! लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा होणार?
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी असलेली लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आलीय. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी ३१ डिसेंबर आनंदाचा ठरणार आहे. त्याच कारण म्हणजे, डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात एक सोडून दोन हप्त्याचे पैसे जमा होतील. महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे पैसे मिळणार आहेत. बँक खात्यात १५०० रुपये नाही तर ३००० रुपये जमा होतील.
डिसेंबर महिना सुरू झाला पण आतापर्यंत लाडक्या बहिणींना अद्याप नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाहीये. वृत्तानुसार, यावेळी नोव्हेंबर आणि डिसेबर महिन्याचे दोन्ही हप्ते बँक खात्यात जमा होणार आहेत. अनेकांना नोव्हेंबर महिन्याचा सन्माननिधी मिळालेला नाहीये. स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकांमुळे अनेकांच्या खात्यात पैसे आले नसावेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाभार्थ्यांच्या खात्यात एकाचवेळी दोन महिन्यांची रक्कम जमा झाली होती.एका अंदाजानुसार पुढील आठवड्यात सरकार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याची शक्यता आहे. अद्याप सरकारने याविषयीची कोणताही अधिकृत घोषणा केलेली नाहीये. दरम्यान जर तुम्ही अजूनही E-KYC केली नसेल तर ही प्रक्रिया पूर्ण करा.
लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्ते मिळणार.
एकूण रक्कम बहिणींच्या बँक खात्यात ३००० रुपये जमा होईल.
काही लाभार्थ्यांना अजूनही नोव्हेंबर हप्ता मिळालेला नाही.
लाभार्थींनी E-KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
