Latur Election 2025
LATUR ELECTION 2025: BJP–NCP ALLIANCE WINS UDGIR MUNICIPAL COUNCIL, SWATI HUDE ELECTED MAYOR

Latur Election 2025: लातूर जिल्ह्यातील उदगीर नगरपरिषेवर राष्ट्रवादी अन् भाजपचा दणदणीत विजय

Udgir Results: लातूर जिल्ह्यातील उदगीर नगरपरिषद निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) युतीने दणदणीत विजय मिळवला.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

लातूर जिल्ह्यातील उदगीर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपच्या युतीने दणदणीत विजय मिळवला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी निवडणूक म्हणून उदगीरकडे लक्ष लागले होते. युतीने नगरपरिषद काबीज करत भाजपला नगराध्यक्षपद दिले असून, राष्ट्रवादीने २० जागा जिंकल्या. भाजपने १३ जागांवर विजय मिळवत नगराध्यक्ष उमेदवार स्वाती हुडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणले.

Latur Election 2025
Ambernath Election 2025: अंबरनाथ नगरपरिषदेवर भाजपाचा झेंडा, भाजपाच्या तेजश्री करंजुळे यांचा दणदणीत विजयी

शिवसेना (शिंदे गट) सोबतच लढली असली तरी त्यांना एकही जागा मिळाली नाही. काँग्रेसला ५ जागांवर समाधान मानावे लागले, तर एमआयएमने २ जागा जिंकत खाते उघडले. या निकालांनी उदगीरच्या राजकारणात महायुतीचा वरचष्मा दिसून आला. जनतेने विकास आणि स्थिरतेला प्राधान्य दिल्याचे युती नेत्यांचे मत आहे.

Latur Election 2025
Nanded Election 2025: नांदेडच्या भोकर आणि मुदखेड नगर परिषदेत भाजपचा झेंडा, भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

नवनिर्वाचित नगराध्यक्ष स्वाती हुडे यांनी विजयानंतर जनतेचे आभार मानले. त्या म्हणाल्या, "नागरिकांच्या विश्वासाला उत्तर देण्यासाठी विकासकामांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि शिक्षण सुविधा सुधारण्याला प्राधान्य देऊ." माजी मंत्री संजय बनसोडे यांनीही राष्ट्रवादी-भाजप युतीला जनतेने भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. ते म्हणाले, "हा विजय जनतेच्या अपेक्षांचा ठाम पुरावा आहे. उदगीरचा सर्वांगीण विकास करू."

Latur Election 2025
Shrivardhan Election: श्रीवर्धन नगरपरिषदेत सत्तांतर, तटकरे गटाला धक्का; ठाकरे गटाचे ॲड. अतुल चौगुले नगराध्यक्षपदी

या निकालांनी लातूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. शिंदे सेनेचा बुडता पराभव आणि युतीची मजबूत एकजूट यामुळे स्थानिक पातळीवर महायुतीला आत्मविश्वास मिळाला आहे. उदगीर नगरपरिषदेत आता नव्या विकास आराखड्याची अपेक्षा आहे.

Summary
  • उदगीर नगरपरिषदेवर भाजप-राष्ट्रवादी युतीचा ताबा

  • भाजपच्या स्वाती हुडे नगराध्यक्षपदी विजयी

  • शिंदे शिवसेनेला एकही जागा नाही

  • महायुतीचा लातूर जिल्ह्यात वाढता प्रभाव

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com