Abdul Sattar
Abdul SattarTeam Lokshahi

शिंदे गटात नाराजी, अब्दुल सत्तारांचे खळबळजनक विधान; म्हणाले, माझ्या पक्षातील लोक...

मी राज्यमंत्री नसतानाही त्या काळातील आरोप माझ्यावर करण्यात आले. मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. माझ्या पक्षातील देखील काही लोकं यात असू शकतात.
Published on

राज्यत सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. तर दुसरीकडे काल प्रचंड गदारोळात राज्याचे हिवाळी अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात विरोधीपक्षाच्या निशाणावर होते ते राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार. त्यांच्यावर गायरान घोटाळ्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. त्याआधीही त्यांच्यावर असेच आरोप लावण्यात आले होते. त्यावरच आता अब्दुल सत्तार यांनी मौन सोडले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. माझ्याच पक्षातील नेते माझ्याविरोधात कट रचत असल्याचा गंभीर आरोप सत्तार यांनी केला आहे.

Abdul Sattar
केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी घेतली राज ठाकरे यांची भेट

काय म्हणाले अब्दुल सत्तार?

मला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. यात काही माझ्या पक्षातील असू शकतात तर काही माझे हितचिंतक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरात होणारी चर्चा बाहेर येत आहे. त्यामुळे आमच्यातील कोणेतरी बाहेर बातम्या पुरवत असल्याचा आरोप सत्तार यांनी केला आहे. तर ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यांच्याकडून हे सर्व सुरु असल्याचं सत्तार म्हणाले.

माझ्यावर झालेल्या सर्व आरोपाचे खुलासे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला आहे. मी राज्यमंत्री नसतानाही त्या काळातील आरोप माझ्यावर करण्यात आले. मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. माझ्या पक्षातील देखील काही लोकं यात असू शकतात. तर विरोधी पक्षात देखील माझे अनेक हितचिंतक आहेत. माझ्यासारखा अल्पसंख्याक व्यक्ती कृषिमंत्री पदावर बसल्याने अनेकांना पाहिले जात नाही. त्यामुळे सतत माझ्याविरोधात कट कारस्थान रचले जात असल्याचा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com