वादग्रस्त मंत्र्यांच्या कारभारावर पांघरूण...; अजित पवारांचा शिंदे गटावर निशाणा

वादग्रस्त मंत्र्यांच्या कारभारावर पांघरूण...; अजित पवारांचा शिंदे गटावर निशाणा

एकनाथ शिंदे यांची जाहिरात काल राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली होती. यानंतर संबंधित नव्याने जाहिरात शिंदे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Published on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहिरात काल राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली होती. यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या नाराजीच्या चर्चांनीही जोर पकडला होता. परंतु,संबंधित जाहिरात शिंदे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण शिंदे गटाकडून दिले. आणि देवेंद्र फडणवीसांसोबतची जाहिरात आजच्या वर्तमानपत्रामध्ये छापण्यात आली. यावरुन आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांवर टीकास्त्र डागले आहे. बूंद से गयी वो हौद से नही आती, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

वादग्रस्त मंत्र्यांच्या कारभारावर पांघरूण...; अजित पवारांचा शिंदे गटावर निशाणा
कालची जाहिरात म्हणजे खोडसाळपणा; बावनकुळेंनी शिवसेनेला दिला 'हा' इशारा

आज पुन्हा जाहिरात बदलून दिली आहे. दोन्ही पक्षांची चिन्हे टाकली आहेत, फोटो टाकले आहेत. कालची आज दुरूस्ती केली गेली. ही सारवासारव करायचा प्रयत्न आहे का? बूंद से गयी वो हौद से नही आती, असा टोला अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे.

जाहिरातीत खाली ९ मंत्र्यांची माळ लावली आहे. मग त्यात भाजपचे का मंत्री नाहीत? वादग्रस्त मंत्र्यांच्या कारभारावर पांघरूण घालायचा प्रयत्न आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. पहिल्या पानावर जाहिरात देणारा कोण हितचिंतक आहे? त्याचे नाव सांगावे. कसा त्याच्याकडे पैसा आला? जाहिरातीचे पैसे कुणी दिले हे समोर यायला हवे. एवढं असेल तर मग निवडणुकीला सामोरे जा. त्यात दूध का दूध व पाणी का पाणी समोर येईल, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

बाळासाहेब ठाकरे काही आक्षेपार्ह बोलले की मनोहर जोशी बोलायचे. मी काही ऐकले नाही. त्या अर्थाने त्यांचा कान खराब झाला आहे का हे माहिती नाही. मला कळलेली इजा ही कानाची आहे, असा जोरदार टोला अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.

ठाणे जिल्ह्यात १०० लोकांना संरक्षण दिले गेलंय. असं काय घडलंय ठाणे जिल्ह्यात. मी याची आरटीआय मधून माहिती मागितली, पण दिली नाही. हा खर्च करोंडोचा आहे. इतर व्यवसाय असणाऱ्यांना संरक्षण दिले आहे. निम्यावर लोकांना संरक्षण देण्याची काही गरज नव्हती. सरकारी पैशांच्या जोरावर मोठेपणा वाढविण्याचा प्रयत्न आहे. सरकारने ही यादी व त्यांचा हुद्दा जाहीर करावा. राज्यकर्ते झालो म्हणून बगलबच्च्यांना संरक्षण देणे योग्य नाही, अशी टीकाही त्यांनी शिंदेंवर केली आहे.

ठाण्यात संरक्षण दिलेल्या व्यक्तीमध्ये वकिल, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते नेते यांची पत्नी, बांधकाम व्यावसायिक, मनसुख हिरेनची पत्नी, आरटीआय कार्यकर्ते, शेठचा मुलगा, प्रवक्ते, केबल व्यावसायिक, परमवीरसिंग प्रकरणातील फिर्यादी, बजरंग दल कार्यकर्ता, आमदारांचा मुलगा, काहींचे पुतणे, असंही अजित पवारांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com