मंत्रिमंडळ विस्तार लवकर केलं पाहिजे नाहीतर...; बच्चू कडूंचे मोठे विधान
सूूरज दहाट | अमरावती : शिवसेनेतील 40 आमदार घेऊन एकनाथ शिंदेंनी ही बंडखोरी केली होती. राजकीय घडामोडीनंतर राज्यात भाजप- शिवसेना शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. आज या शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. परंतु, अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असल्याने विरोधकांकडून टीका करण्यात येतं आहे. अशातच, मंत्रिमंडळ विस्तार जुलैमध्ये होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावर बच्चू कडू यांनी मोठे विधान केले आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
मंत्रिमंडळ विस्तार लवकर करून मोकळं केलं पाहिजे नाही तर सांगून द्या २०२४मध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल. एका एका मंत्र्यांकडे 8 खाते आहेत कामे होत नाही फाईली अडकून पडल्या आहेत. पालकमंत्री असते तर प्रशासनावर वचक राहते, असे बच्चू कडू यांनी म्हंटले आहे.
तर, देवेंद्र फडणवीस शिंदे गटातील नेत्यांवर नाराज असल्याचे चर्चा आहे. यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले, फडणवीस शिंदे गटाच्या मंत्र्यांवर नाराज नाही. त्यांच्या हातातच सगळं आहे. चांगले मंत्री असेल तर राहील अन्यथा त्यांना डच्चू मिळेल, असे त्यांनी सांगितले आहे.

