उद्धव ठाकरे यांचे चिन्ह म्हणजे "पंजाच्या हाती मशाल" बावनकुळेंची विखारी टीका
राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विवध विषयावरून जोरदार आरोप- प्रत्यारोप सुरु आहे. अशातच काल निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांना नवे नाव दिले आहे. ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले तर शिंदे गटाच्या चिन्हावर आज निर्णय येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक राजकीय मंडळीकडून याबाबत प्रतिक्रिया येत आहे. यावरच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
माध्यमांशी बोलत असताना उद्धव ठाकरे यांच्या गटाला मिळालेल्या नाव आणि चिन्हाबद्दल बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे चिन्ह म्हणजे "पंजाचा( कांग्रेस) हाती मशाल" असे असून ठाकरे यांची मशाल कांग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आश्रयावर असल्याने ही मशाल काही पेटनार नाही अशी खोचक टीका यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटावर केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री पद मिळविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी संपुर्ण पक्षाचे नुकसान केले आहे. हिदुत्वाची विचार सोडून कांग्रेस- राष्ट्रवादी विचार स्वीकार केल्याने तुमची मशाल पेटनार नसल्याची तिखट प्रतिक्रिया दिली आहे. तुमच्या अडीच वर्षाच्या राज्यकारभार लोकांनी बघितला , बिघडलेले हिंदुत्व लोकांनी बघितले आता पंजा पर्यायने कांग्रेसच्या हातात मशाल देऊन उद्भव ठाकरे यांनी आपले प्रचंड नुकसान केल्याचे बावनकुळे म्हणाले आहे.