Gurupournima : बाळासाहेब आमच्या पाठीशी; स्मृतीस्थळाला भेट दिल्यावर एकनाथ शिंदेंचा विश्वास

Gurupournima : बाळासाहेब आमच्या पाठीशी; स्मृतीस्थळाला भेट दिल्यावर एकनाथ शिंदेंचा विश्वास

बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच आपल्याला ही संधी मिळाली आणि या सगळ्या घडामोडी शक्य झाल्या. त्यांचे विचार मी आणि माझ्यासोबतचे आमदार पुढे नेतील.
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज गुरुपौर्णिमेनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिंदे यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं. तसंच बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच ही संधी मिळाली आहे. त्यांच्या आशीर्वादाने आम्ही त्यांचे विचार राज्यात पुढे नेतोय, असं प्रतिपादनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी केलं आहे.

Gurupournima : बाळासाहेब आमच्या पाठीशी; स्मृतीस्थळाला भेट दिल्यावर एकनाथ शिंदेंचा विश्वास
शिवसेनेला धक्का देणाऱ्या प्रवक्त्या शितल म्हात्रेंची पक्षातून हकालपट्टी, सेनेला फटका

बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) स्मृतीस्थळावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना वंदन केलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच आपल्याला ही संधी मिळाली आणि या सगळ्या घडामोडी शक्य झाल्या. त्यांचे विचार मी आणि माझ्यासोबतचे आमदार पुढे नेतील.

Gurupournima : बाळासाहेब आमच्या पाठीशी; स्मृतीस्थळाला भेट दिल्यावर एकनाथ शिंदेंचा विश्वास
देवेंद्र फडणवीस ‘शिवतीर्थ’वर राज ठाकरेंच्या भेटीला जाणार, कारण...

राज्यात मराठी माणसाला, हिंदुत्वाला ताठ मानेने जगण्याची शिकवण त्यांनी दिली. तसेच बाळासाहेबांच्या विचारांवर आम्ही चालत आहोत. आम्ही राज्याचा सर्वांगीण विकास करू. सर्व समाजघटकांचा उत्कर्ष, विकास हेच आमचं ध्येय असेल. म्हणूनच त्यांना वंदन करुन आम्ही आशीर्वाद घेतले आहेत. बाळासाहेब आमच्या पाठीशी आहेत असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com