डोंबिवली पश्चिम भागात मनसेचे बॅनर्स का आहेत चर्चेत?
डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात बॅनरचा विषय चर्चेत:
डोंबिवली शहरात गेल्या काही दिवसांपासून मनसे विरुद्ध शिंदे गट यांच्यामध्ये एकमेकांच्या विरोधात बॅनरबाजी सुरू आहे.शिंदे गटाने बॅनरबाजी करून मनसेचे चिन्ह रेल्वे इंजिन हे बॅनर उलटे लावत मनसेला डिवचण्याचं प्रयत्न केला होता.यातच अंधेरी पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आल्याने चिन्हांचा विषय गाजू लागला आहे.त्यामुळे हिच संधी साधून मनसेने डोंबिवली शहरात आमची निशाणी रेल्वे इंजिन असा उल्लेख असलेला बॅनर लावण्यात आले आहेत.तर हा बॅनर शिंदे गटाला आणि ठाकरे गटाला डिवचण्यासाठी लावण्यात आला आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहेत याबाबत डोंबिवली शहराचे मनसेचे शहर सचिव संदीप म्हात्रे यांना विचारलं असता आम्ही कोणाला डिवचण्यासाठी हे बॅनर लावले नाहीत त्याच प्रमाणे आमच्या पक्षाचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देण्यास मनाई केली आहे तरी डोंबिवली शहरात हे बॅनर दोन्ही गटाला डिचवण्यासाठी लावले असावे अशी चर्चा आता होऊ लागली आहे.त्यामुळे हे बॅनर आता लक्ष वेधून घेत आहेत.