Narayan Rane On Uddhav Thackeray : 'उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता, आणि आता का म्हणून...'
(Narayan Rane On Uddhav Thackeray ) गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याच्या अनेक चर्चा सुरू आहेत यातच मराठीच्या मुद्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यात एकत्र घेणार असल्याचीही माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता नारायण राणे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
नारायण राणे म्हणाले की, 'उद्धव ठाकरे सन्माननीय राज जी ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्याने परत या असे म्हणून प्रयत्न करीत आहेत. मला आठवते याच उद्धव ठाकरेंनी राज जी ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची यांना जाणीव नाही वाटतं? आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत.'
'सन्माननीय राज जी, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिले त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून दिला. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसविले, याने सत्ता घालविली. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहे. मराठी माणसाने व हिंदूंनी याला घरी बसविले. गेलेले परत मिळवण्याची धमक व क्षमता उद्धव ठाकरे मध्ये नाही ! जो बूंद से गई वो हौद से नहीं आती!' असे नारायण राणे म्हणाले.