Jitendra Awhad
Jitendra AwhadTeam Lokshahi

'मला कधीपण अटक होऊ शकते' जिंतेद्र आव्हांचे खळबळजनक विधान

मी धक्कादायक माहिती महाराष्ट्राला देऊ इच्छितो.ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या कानावर घातलंय की, कुठल्याही परिस्थितीत तुला अटक केली जाईल.
Published on

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार जुंपलेली दिसत आहे. याच वादादरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक विधान केले आहे. मला कोणत्याही क्षणी अटक होईल. असं मोठं वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटी आधी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Jitendra Awhad
'विरोधकांनी सकाळीच हे ठरवलं होतं' अर्थसंकल्पावर विरोधकांच्या टीकेला फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

आज जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी या भेटीआधी माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी एक मोठे वक्तव केले आहे. ते म्हणाले की, मी धक्कादायक माहिती महाराष्ट्राला देऊ इच्छितो.ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या कानावर घातलंय की, केंद्रातील काही अधिकाऱ्यांनी मला सूचक माहिती दिलीय. कुठल्याही परिस्थितीत तुला अटक केली जाईल. असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.

पुढे ते म्हणाले की, निदान ठाणे महापालिका निवडणूक होईपर्यंत आणि त्यानंतरचे काही महिने तुला आतमध्ये ठेवण्याचा कार्यक्रम ठरलेला आहे. तसं माझ्या विरोधात एकही केस नाही. पण ही जेव्हा बातमी येते तेव्हा आश्चर्य वाटतं. अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय.

Jitendra Awhad
...तर हा देशाचा ‘अमृत काळ’ कसा; अजित पवारांचा अर्थसंकल्पावर सवाल

दरम्यान जितेंद्र आव्हाडआणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे भेट झाली. जितेंद्र आव्हाड यांच्यावर नेमकं कोणत्या गुन्ह्याअंतर्गत अटक होईल, याबाबतची माहिती मात्र त्यांनी दिलेली नाही. पण केंद्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आपल्याला जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन आखण्यात आल्याचा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यासाठी नेमके कोणाचे प्रयत्न सुरु आहेत? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com