PM Modi | CM Shinde
PM Modi | CM ShindeTeam Lokshahi

सहकुटुंब भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांकडून कौतुक; म्हणाले, कष्टाळू मुख्यमंत्री...

माझ्या कुटुंबाशी निवांत गप्पा मारल्या. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांचे आभार मानले होते.
Published by :
Sagar Pradhan
Published on

PM Modi And CM Shinde Meet: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शनिवारी 22 जुलै रोजी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी मोदींची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली. त्यांनी पंतप्रधान मोदी यांनी भेटीसाठी वेळ काढल्याबद्दल त्यांचे आभार मानले. दरम्यान आता मुख्यमंत्र्यांच्या त्याच ट्वीटला रिट्वीट करत पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केलेय.

PM Modi | CM Shinde
मोठी बातमी! इर्शाळवाडी येथील रेस्क्यू ऑपरेशन प्रशासनाने थांबवले; अद्यापही काही जण बेपत्ता

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या ट्वीटला रिट्वीट करत लिहलं की, ''महाराष्ट्राचे गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीची त्यांची तळमळ आणि विनम्र स्वभाव कौतुकास्पद आहे.'' अशा शब्दात पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.

मुख्यमंत्र्यांनी काय केले होते ट्वीट?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो ट्वीट करत लिहिलं की, ''देशाचे पंतप्रधान म्हणून कणखर आणि सक्षम असलेल्या मा. नरेंद्र मोदीजी यांनी आज माझे वडील, पत्नी, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून आणि नातू यांच्यासह मला सदिच्छा भेटीला बोलावून आपलेपणाने विचारपूस केली. माझ्या कुटुंबाशी निवांत गप्पा मारल्या. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला.'' असे ते म्हणाले होत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com