Vijay ShivtareTeam Lokshahi
राजकारण
आंदोलन करू नका नाहीतर तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करेल; शिवतारेंनी दिली धमकी?
राजकीय वर्तुळात एकच खळबळ
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते विजय शिवतारे यांनी आंदोलन करू नका नाहीतर मी तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करेन, अशी धमकी दिल्याचे आरोप संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सुतारवाडी पाषाण परिसरातील अतिक्रमण हटवण्याबाबत उत्तम कामठे आज सकाळपासून पुण्याच्या मनपा कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. या आंदोलनादरम्यान शिवतारे यांनी कामठेंना फोन करुन धमकी दिली. विजय शिवतारे यांनी अध्यक्ष उत्तम कामठे आंदोलन करू नका नाहीतर मी तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करेन, अशी धमकीही दिल्याचा आरोप कामठेंनी केला आहे. दरम्यान, यावर आता शिंदे गटाची काय प्रतिक्रिया असणार यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.