Maratha Reservation : नुसतं टिकणारे आरक्षण म्हणजे काय? संभाजीराजेंचा सरकारला थेट सवाल
मुंबई : मराठा आरक्षणावरुन सध्या राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे. मनोज जरांगे यांनी येत्या 20 जानेवारीला मुंबईमध्ये उपोषण करणार असल्याचं जाहिर केले आहे. जरांगेंनी सर्व मराठा समाजाला मोठ्या संख्येने आझाद मैदानावर येण्याचं आवाहन केलं आहे. परंतु, राज्य सरकारने वेळ मागितला असून टिकणारे आरक्षण देणार असल्याचे सांगितले आहे. यावरुन संभाजीराजे छत्रपती यांनी नुसतं टिकणारे आरक्षण म्हणजे काय? असा सवाल केला आहे. ते आज लोकशाही पॉडकास्टमध्ये बोलत होते.
संभाजीराजे म्हणाले की, सरकारने आणखी स्पष्टीकरण दिले नाही की आपण आरक्षण कसं देणार? मराठा समाजाला कुणबी आरक्षण पाहिजे. यावर सरकार म्हणतं कोणालाही धक्का न लागता आम्ही आरक्षण देणार आहे, टिकणार आरक्षण देणार आहे. परंतु, त्यावर सरकारने आणखी क्लियर केलंलं नाही. नुसतं टिकणारे आरक्षण म्हणजे काय? मनोज जरांगे मुंबईत येण्याची वाट का बघत आहेत, असा सवालच त्यांनी सरकारला केला आहे. सगळ्या खासदारांनी आरक्षण विषय त्याठिकाणी मांडला पाहिजे, असेही त्यांनी म्हंटले आहे. देवेंद्र फडणवीस वकील आहेत त्यांना आरक्षणाबाबत सगळं माहित आहे, त्यामुळे ते पळून जाऊ शकत नाही, अशी खोचक टिप्पणीही संभाजीराजेंनी केली आहे.
1982 चं निकष आता लागू होत नाही. इंदिरा साहनीचे निकष सरकारने बदलले पाहिजे. 27 राज्यांना 50 टक्क्यांच्या वर कसं आरक्षण दिले तर मग महाराष्ट्राला का देऊ शकत नाही, असाही जाब संभाजीराजेंनी विचारला आहे. स्वराज्य यावरच जनहित याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 35 वर्षाचे निकष कोणी बदलू शकतं तर ते पंतप्रधान आहेत. खासदार असताना अनेकदा मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांकडे वेळ मागितला. परंतु, मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांनी वेळ दिली नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. मला वैयक्तिक आरक्षणाची गरज नाही पण समाजाला आरक्षणाची गरज आहे. मला तुम्ही म्हंटले कुणबी व्हा तर मी नाही म्हणणार पण समाजाला याची गरज आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
मागील काही महिन्यांपासून जातीय विषमता वाढली आहे. जातीनिहाय जनगणनेमुळे लगेच आरक्षण मिळेल, असे मत संभाजीराजेंनी व्यक्त केले आहे. मनोज जरांगे पाटील समाजासाठी चांगले काम करतात. मनोज जरांगे राजकारणासाठी काही करत असतील असं मला वाटतं नाही. का पुढाऱ्यांने असे केलं तर चर्चा होत नाही पण एका सामान्य माणसांच्या माध्यमातून समाज उभा राहतो तेव्हा चर्चा होतं, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, 2009 आणि 2024 मध्ये संभाजीराजे छत्रपतींमध्ये मोठा बदल झाला. 2009 च्या जखमा मी नवखा होतो ते मी विसरलो नाही. त्यांनी माझा नाही तर नवख्या छत्रतींचा पराभव केला होता. पश्चिम महाष्ट्रातून कोल्हापूर, खानदेशातून नाशिक आणि मराठवाड्यातून बीड आणि संभाजीनगर निवडणुकीसाठी वातावरण पोषक आहे, असे संभाजीराजे म्हणाले आहेत. मला राष्ट्रपती नियुक्त खासदार केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधानांचे मी आभार मानतो, असेही त्यांनी म्हंटले आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत नैसर्गिक युती होऊ शकते, असे मोठे विधानही त्यांनी केले आहे.