ते पदाला शोभणारे नाही; नार्वेकर-शिंदे भेटीवर शरद पवारांची टीका

ते पदाला शोभणारे नाही; नार्वेकर-शिंदे भेटीवर शरद पवारांची टीका

आमदार अपात्रता प्रकरणावर 10 जानेवारी रोजी निकाल लागणार आहे. अशातच, राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीवर शरद पवारांनी टीका केली आहे.
Published on

मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणावर 10 जानेवारी रोजी निकाल लागणार आहे. अशातच, राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीवर शरद पवारांनी टीका केली आहे. ज्यांची केस आहे, त्यांनी ती मांडणे त्यात काही चूक नाही. पण त्यांच्यासमोर जी केस आहे त्यांनी अशाप्रकारे वागणे संशयाला जागा देते. ते या पदाला शोभणारे नाही, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली आहे.

ते पदाला शोभणारे नाही; नार्वेकर-शिंदे भेटीवर शरद पवारांची टीका
निकालापूर्वी नार्वेकर - शिंदेंच्या भेटीवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

राजकारणात वयाची अट असते. मात्र वयाची ८०-८४ ओलांडली तरी थांबायला तयार नाही, असा टोला अजित पवार यांनी शरद पवारांना लगावला होता. याला प्रत्युत्तर शरद पवारांनी दिले आहे. माझा राज्यसभेचा कार्यकाळ अडीच वर्षे शिल्लक आहे. त्यानंतर मी निवडणूक लढणार नाही, हे स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे माझ्या वयासंदर्भात बोलायचा प्रश्नच उद्भवत नाही, असे शरद पवारांनी म्हंटले आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीची आज दिल्लीत बैठक होत आहे. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व ठाकरे गटात बैठक होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये एकत्रित काम कसे करायचे यावर चर्चा होईल. जितेंद्र आव्हाड या बैठकीत उपस्थित राहून पक्षाच्या वतीने भूमिका मांडतील. अंतिम बैठक होईल, तेव्हा पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित असतील. आम्ही जे सुचवितोय, त्यासंदर्भात सर्वांची भूमिका समान असेल अशी अपेक्षा आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com