बिल्किस बानो प्रकरणी शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, शिंदे-फडणवीसांनी...
मुंबई : बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींना सुप्रीम कोर्टाने झटका दिला आहे. बिल्कीस बानोच्या आरोपींच्या सुटकेचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. गुन्हा जरी गुजरातमध्ये घडला असला, तरी महाराष्ट्रात या प्रकरणी आरोपींवर खटला चालवून त्यांना शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यामुळे गुजरात सरकारला आरोपींची शिक्षा माफ करण्याचा अधिकार नाही, असेही सुप्रीम कोर्टाने फटकारले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले की, काल सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला. बिल्कीस बानो केसमध्ये गोध्रामध्ये जे घडले, त्यानंतर झालेल्या पडसादावर ही घटना घडली होती. सुप्रीम कोर्टाने जी भूमिका घेतली ती एकाप्रकारे सामान्य माणसाला आधार देण्याचे काम केले आहे. गुन्हेगारांना शिक्षा माफ करण्याचा निर्णय गुजरातने घेतला होता तो निर्णय महाराष्ट्र सरकारने घेण्याचे आदेश दिला आहे.
त्या भगिनीला न्याय देण्याचा निकाल महाराष्ट्र सरकार घेईल, अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना ही विनंती करेल की ही अत्याचार करणारी प्रवृत्ती आहे. त्यांना समाजाचा एक संदेश जाईल. महाराष्ट्रात असो होऊ नये असा निर्णय घ्यायला हवा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. या केसची गांभीर्यानं पाहिले तर त्या महिलेने जे सोसले, तिच्यावर जे अत्याचार झाले. ते पाहिल्यावर महाराष्ट्र सरकार याबाबत गांभीर्याने निर्णय घेईल. याबाबत हवे ते ठोस निर्णय सरकार घेईल, असेही शरद पवारांनी म्हंटले आहे.